जयंत पाटलांकडून शिंदेंना बादशाहची उपमा; म्हणाले, बादशाहच्या मनात आलं अन्…

  • Written By: Published:
जयंत पाटलांकडून शिंदेंना बादशाहची उपमा; म्हणाले, बादशाहच्या मनात आलं अन्…

मुंबई : वरळीमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणावरून एकीकडे राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना आता जयंत पाटलांनी (Jayant Patil) कावेरी नवखा यांना दिलेल्या मदतीच्या रकमेवरून शिंदेंची तुलना बादशाहसोबत करत त्यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. (Jayant Patil Attack On Eknath Shinde )

Maharashtra Politics : विधानसभेसाठी पवारांचा डाव यशस्वी; भाजपचा मोठा एक्का अखेर हेरलाच

पाटील म्हणाले की, वरळी येथील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कावेरी नवखा यांना सरकारकडून 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून, बादशाहच्या मनात आलं आणि हिट अँड रन प्रकरणातील मदतीची रक्कम 25 लाखांवरून 10 लाखांवर आली. तर बादशाहच्या मनात आलं क्रिकेटच्या शौकीनांना खुश करण्यासाठी क्रिकेटविरांना 11 कोटी दिले. याचाच अर्थ दिवा विझतांना मोठा होतो तसे हे सरकार भूमिका घेत आहे. लोकसभेनंतर विधानसभेत या सर्वांचा पराभव राज्यातील जनता करणार आहे असा दावाही जयंत पाटलांनी बोलताना केला.

गृहमंत्री यूजलेस

तर, दुसरीकडे उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांनीदेखील 10 लाखांच्या मदतीवरून शिंदे आणि फडणवीसांना धारेवर धरले आहे. ते म्हणाले की, नाखवा यांचा जीव काय दहा लाखांचा आहे का? असा सवाल करत राऊतांनी राज्याचे गृहमंत्री युजलेस असून, काही झाले की सीएम पैसे वाटत फिरतात त्या काय खोकेवाल्या आमदाराची बायको आहे की खोकेवाले असल्याचे राऊत म्हणाले. वरळीतील एवढ्या मोठ्या अपघातनंतरही गृमंत्र्यांकडून साधं निवेदन काय साधी संवेदनाही व्यक्त करण्यात आली नसल्याचे राऊत म्हणाले.

सारसबागेत गर्दी जमवून गणपतीची आरती, तरुणावर थेट गुन्हा; पुण्यातील प्रकार

चेंगराचेंगरी झाली, 5-5 लाख रुपये दिले, 50 लाख दिले. अपघात झाला, खून झाला 50 लाख दिले. हे काय पैशांचं राजकारण सुरूय काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा तुम्ही केलीत. मुंबईच्या रस्त्यावर कावेरी नाखवांचा मृत्यू झाला. ज्यांच्या मुलानं हे केलं, तो एकनाथ शिंदें यांचा यांचा निकटवर्तीय आहे. निर्दयीपणे कावेरी नाखवांना चिरडलं गेलं, ती तुमची लाडकी बहीण नाही का? कुठे आहेत गृहमंत्री? या राज्याला गृहमंत्री आहेत की नाही? शांत का बसलेत? महिलेचा आक्रोश तुमच्या कानांपर्यंत पोहोचला नाही?”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज