Gopichand Padalkar on Sharad Pawar and Supriya Sule : शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही… या सुप्रिया सुळेंच्या विधानावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंवर जोरदार हमला केलाय. जरांगे, शिंदे आणि पवार हे मराठा जातीचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस ब्राह्मण जातीचे, या लोकांचे राजकारण (Gopichand Padalkar) महाराष्ट्रातील लोकांना समजलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर बोललं पाहिजे. कारण त्यांचं नाव घेऊन महाराष्ट्रात संभ्रम निर्माण केला जातोय असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
फडणवीस-महाजन नड्डांपेक्षाही मोठे नेते, त्यांच्यामुळेच माझा.नाथाभाऊंची खोचक पण थेट टीका
छत्रपती संभाजीराजेंना खासदारकी दिली
देवेंद्र फडणवीस यांना नियोजनबद्ध पद्धतीने कसं टार्गेट केलं जातंय, त्यांच्यावर हल्ला केला जातोय, तो हल्ला करण्यासाठी काही माणसं पेरायची, विशिष्ट संघटनांना बळ द्यायचं, काही पत्रकारांना हाताशी धरायचं आणि देवेंद्र फडणवीसांवर जातीयवादातून टीका करायची. स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचं आणि जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचे वारस छत्रपती संभाजीराजेंना खासदारकी दिली तेव्हा पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमायचे आणि आता पेशवे छत्रपतींना नेमतायेत असं विधान द्यायचे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यसभा देण्याआधी शाहू महाराजांच्या वारसांना यांनी कधीही खासदारकी दिली नव्हती असा दावारी पडळकरांनी केलाय.
जसा बाप तशी लेक
महाराष्ट्रात जे जातीवादाचं विष पेरलं जातंय त्याकडे जनता सुज्ञपणाने बघतीय. पवारांचा फॉर्म्युला आहे, पुरोगामीच्या बाता मारायच्या आणि जातीवादावर चर्चा घडवायच्या. देवेंद्र फडणवीस तुम्हाला पुरुन उरलेत. ते कशातच सापडत नाहीत म्हणून त्यांच्या जातीवर बोला. लहानपणापासून शरद पवारांकडून ज्या सुप्रिया सुळे शिकल्या, पवार हे जातीवादाचं विद्यापीठ आहेत. त्यामुळे लिंबाच्या झाडापासून गोड फळाची अपेक्षा करणं चुकीचं आहे तसं जसा बाप तशी लेक असा घणाघाती वार पडळकरांनी यावेळी केलाय.
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; अभिनंदन महाराष्ट्र म्हणत, देवेंद्र फडणवीसांनी थेट आकडेच मांडले
स्वत:तील किडकी बहीण
अजित पवारांनाही सहानुभूती दाखवायची नाही असं पुढे जाऊन सुप्रिया सुळे सांगतात. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायेत आणि सुप्रिया सुळे स्वत:तील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवतायेत अशी खोचक टीकाही गोपीचंद पडळकरांनी सुप्रिया सुळेंवर केली. दरम्यन, गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेनंतर आता राज्यभरातून जोरदार टीका होत आहे. तसंच, आता भापज आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
शिंदे से बैर नही पर देवेंद्र तेरी खैर नही… या सुप्रिया सुळेंच्या विधानावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंवर जोरदार हमला केलाय. #gopichandpadalkar #sharadpawar #supriyasule pic.twitter.com/RqcU0j44ZO
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) September 6, 2024