BJP MLA Prasad Lad, responding to OBC Leader Lakshaman Hake : भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मारण्याची भाषा केली होती. त्यावर प्रसाद लाड यांनी आता मी सॉफेस्टिकेटेड आणि व्हाईट कॉलर झालो आहे. पण तीस वर्षांपूर्वी मी कसा होतो? हे त्याला माहिती नाही असं म्हणत एक प्रकारे आव्हान दिलं आहे. त्यांनी लेट्सअप मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक प्रश्नाला रोखठोक उत्तरं दिली.
नेमकं काय म्हणाले प्रसाद लाड?
यावेळी लाड यांना हाकेंच्या लाड यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर ते म्हणाले की, लक्ष्मण हाके यांना तीस वर्षांपूर्वी प्रसाद लाड कसे होते? हे समजावून सांगा त्यानंतर लाथा मारण्याची भाषा करा म्हणा आता मी सॉफेस्टिकेटेड आणि व्हाईट कॉलर झालो आहे. पण तीस वर्षांपूर्वी मी कसा होतो? हे त्याला माहिती नाही पण ते माझ्याबद्दल वाईट बोलले म्हणून मी त्याबद्दल वाईट बोलणार नाही.
Video : नरेंद्र’ नावामुळे पाकिस्तानी बॉक्सर वैतागला; PM मोदींसमोर भारतीय बॉक्सरने सांगितला किस्सा
ज्या माणसाला स्वतःला काही करण्याची हिंमत नाही. तो समाजाच्या नावाखाली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतोय, विधान परिषदेला जायचं होतं म्हणून दोन-दोन दिवस तास एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर जो माणूस बसत होता. तो समाजाचा काय हित करणार त्यांना जे काही करायचं ते त्यांनी करावं मात्र त्यांनी असं वयक्तिक टीका करू नये. तसेच त्यांनी एकदा मंत्रालयात चुकून भेट झाली असताना वैयक्तिक बोलल्या वरून चूक झाल्याचे हे कबूल केलेला आहे. ते माझ्यावर जरांगेंना मदत केल्याचे केल्याचा आरोप करताय पण मी केवळ जरांगे नमूद करत नाही जरांगे नावाच्या कार्यकर्त्याला मदत करतोय जो मराठा समाजासाठी संघर्ष करतोय. त्यांना कोणताही पद नको आहे समाजासाठी ते संघर्ष करत आहे त्यांची भाषा चुकीची असेल तर त्यांना मी ते बोलूनही दाखवलेलं आहे.
मुंढेंच्या कारवाईवर परेश रावल फिदा; फडणवीसांना म्हणाले, “तुमचं हे कर्तव्य आहे…”
जरांगे पाटील हे माझे मित्र नाहीत मी माझ्या पक्षाचं आणि ते समाजाचं काम करतात. मी त्यांचा आदर करतो,ते माझ्या आदर करतात मात्र त्यांनी जेव्हा फडणवीसांवर टीका केली. तेव्हा त्यांना सर्वात पहिल्यांदा अंगावर घेणारा मीच आहे. हाकेंपेक्षाही घाणेरड्या भाषेत जरांगे माझ्या बाबत बोलले होते. पण मीडियाच्या माध्यमातून त्यांनी मला आवाहन केले. मी त्यांना भेटलो त्यावेळी त्यांना जाणवलं की, मी समाजासाठी काहीतरी करू शकतो. तेव्हा त्यांनी मला ती संधी दिली.
त्यानंतर त्यांचा गैरसमज दूर झाला. तसाच गैरसमज लक्ष्मण हाके यांचा देखील झाला आहे. त्यामुळे ते माझ्या नावाने हाकमारी करत फिरत आहेत. माझी कधीही मराठ्यांचा आरक्षण काढून ओबीसींना आणि ओबीसींचा आरक्षण काढून मराठ्यांना देण्याची भूमिका नाही. तसेच याबाबत देवेंद्र फडणवीस यांचे देखील स्पष्ट भूमिका आहे की, ज्याच्या हक्काचा आरक्षण आहे. ते त्याला दिलेच पाहिजे. तसेच हाके एकटे ओबीसी नेते नाहीत इतरही आहेत त्यांनी माझ्याबाबत कधीही आक्षेप घेतला नाही.
