Mla Shivajirao Kardile News : राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले (Mla Shivajirao Kardile) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी समोर आलीयं. कर्डिले यांना पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्यांना साईदीप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे घोषित केले.
मतदार यादीत घोळ, निवडणूक होईल की नाही?; आमदार भास्कर जाधवांना वेगळीच शंका…
ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं आहे. याआधी ते चांगले अॅक्टिव्ह होते, पहाटेच्या सुमारास उठल्यानंतर त्यांना अचानक छातीत दुखू लागले. हा तीव्र स्वरुपाचा ह्रदयविकाराचा झटका होता, त्यामुळे त्यांच निधन झालं असल्याची माहिती साईदीपचे डॉ. एस.एस. दीपक यांनी दिली.
कर्डिले यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या धक्क्याने कर्डीले यांचे निधन झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.
आयोगात भाजपचा पदाधिकारी? रोहित पवारांकडून राहुल गांधींप्रमाणे थेट फोटो दाखवत मतचोरीची पोल खोल
मागील अनेक दिवसांपासून कर्डिले यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत होती. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा मोठ्या फरकाने विजय मिळवत पुन्हा विधानसभेत एन्ट्री केली. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर कर्डिले यांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, त्यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळालं नाही. मात्र, जिल्हा सहकारी बॅंकेत ते चेअरमन राहिले होते.