यंदाच्या मनपा निवडणुकीनंतर ठाकरें बंधुंचं राजकारण मुंबईतून पूर्णत: संपणार; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं

Nishikant Dubey यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचत राज आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार असल्याची भाषा केली आहे.

Letsupp Marathi (44)

Letsupp Marathi (44)

BJP MP Nishikant Dubey again contervercial statment about maharashtra and marathi speakers : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे खासदार निशिकांत दुबे हे मराठी आणि हिंदी भाषेच्या वादावरून विविध वादग्रस्त विधानं करत आहेत. यामध्ये ते राज आणि उद्धव ठाकरेंसह मराठी माणसांवर देखील टीपण्णी करत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मराठी माणसांना डिवचत राज आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार असल्याची भाषा केली आहे.

अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पतीला संपवण्याचा प्लॅन फसला; वाचा, नक्की काय घडलं?

काय म्हणाले निशिकांत दुबे?

यावेळी डीडी न्युजला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना निशिकांत दुबे म्हणाले की, मुंबई घडवण्यामध्ये युपी, बिहार आणि हिंदी भाषिकांचं मोठं योगदान आहे. मी म्हणणार नाही की, फक्त आमचंच पण अर्थव्यवस्थेमध्ये देखील आमचीही मोठं योगदान आहे. मुंबईत सध्या केवळ 30 टक्के लोक मराठी बोलतात. 12 टक्के उर्दु, 30 टक्के हिंदी तर प्रत्येकी 2 अडिच टक्केमध्ये इतर भाषिक आहेत.

दिल्लीच्या VIP भागात खासदारच असुरक्षित, महिला खासदाराची सोनसाखळी हिसकावली, आर सुधांचे थेट गृहमंत्र्याना पत्र..

आता भौगोलिक बदल झालाय हे ठाकरे बंधुंनी मान्य केलं पाहिजे. अन्यथा निवडणुकीसाठी भाषेचं राजकारण करणाऱ्या मनसे आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण यंदाच्या निवडणुकीमध्ये मुंबईतून पुर्णपणे संपून जाईल. कारण त्यांचे पैसे कमावण्याचं साधन बंद झाले आहे. सर्वांनी त्यांच्या विरोधात मतं दिल्यास यापुढे त्यांना राजकारण करण्याची संधी मिळणार नाही.

Exit mobile version