Download App

गांधी कुटुंबीयांना ओळखत नाही; पक्षांतर चर्चांवर पंकजांचा पूर्णविराम!

Pankaja Munde On Congress Join Rumour :  मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटले नाही. ज्यांनी माझी बदनामी केली त्या वाहिनीवर मी दावा ठोकणार.  बातमी दाखविणाऱ्या वाहिनीवर मी केस दाखल करणार. सतत मी माझी भूमिका स्पष्ट करणार नाही. सतत मी पक्षातून बाहेर जाण्याबाबत चर्चा केल्या जातात. मला जेव्हा जेव्हा तिकीट मिळालं नाही तेव्हा मी प्रतिक्रिया दिली नाही. यावर पक्षानंही स्पष्टीकरण दिलं पाहिजे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी शपथ घेऊन सांगते की, पक्ष प्रवेशाबाबत मी कोणत्याही नेत्याला भेटले नाही. यामुळे नाराज नसून मी दु:खी आहे. बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, शरद पवारांची राष्ट्रवादी राहिली नाही. पण पंडित दीनदयाल उपाध्याय यांची भाजप रहावी म्हणून सतत प्रयत्न करणार.

आत्ता 44 प्लसचा आकडा, आगे आगे देखो.., आमदार अनिल पाटलांनी व्यक्त केला विश्वास

राहुल गांधी यांना समोरा-समोर मी आजपर्यंत पाहिलं नाही. सोनिया गांधी आणि मी भेटलेले नाही. मी लपून छपू काम करत नाही. मी कोणताही निर्णय लपून घेत नाही, जो निर्णय घेईन तो उघडपणे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील  दोन महिने मी ब्रेक घेणार आहे. तसेच अंतर्मुख होऊन विचार करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली. माझ्या पक्षाला माझ्या बद्दल सन्मान वाटला असेल, माझ्यासाठी पक्षाचा निर्णय अंतिम असेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या भेटीवरही उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की,  धनंजय मुंडे मला भेटायला आले होते. त्यांनी शपथ घेतली मग ते मला भेटायला आले. चार दिवसांपूर्वी ते भेटायला आले. मी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी आज ते ट्विट का केले ते माहित नाही.

ठाकरे गट अन् सुळे गट आगामी निवडणुका पंजाच्या निशाणीवर लढवणार; नितेश राणेंचा टोला

दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर  पंकजा मुंडे नाराज झाल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. एवढेच नाही तर पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून त्यांची राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्याशी भेट झाल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या होत्या. यावर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

Tags

follow us