ठाकरे गट अन् सुळे गट आगामी निवडणुका पंजाच्या निशाणीवर लढवणार; नितेश राणेंचा टोला

ठाकरे गट अन् सुळे गट आगामी निवडणुका पंजाच्या निशाणीवर लढवणार; नितेश राणेंचा टोला

Nitesh Rane : येणाऱ्या अधिवेशनामध्ये कॉंग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता असणार आहे. त्याचबरोबर दिल्लीमध्ये राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे उबाठा गट आणि सुळे गट हे कॉंग्रेसमध्ये विलीन होणार आहेत. येणाऱ्या निवडणुका ते हाताचा पंजा या निवडणूक निशाणीवर लढवणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. तर जशी राहुल गांधींनी शरद पवारांची भेट घेतली. तसे संजय राऊत काल मातोश्रीवर होते. त्यावेळी यावर चर्चा झाली. तेव्हा हे खोट आहे. असं राऊतांनी सांगावं. अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. (Nitesh Rane Criticize Shivsena UBT and Sharad pawar NCP for Merge in Congress )

‘अजितदादांनी वस्तुस्थिती सांगितली, हम करे सो चालत नसतं’; भाजप आमदाराचा रोख कुणाकडे

पुढे नितेश राणे म्हणाले की, प्रत्येक पक्षामध्ये राहुल गांधी असतो. उद्धव ठाकरे गटामध्ये आदित्य तर सुळे गटामध्ये रोहित पवार आहेत. यावेळी ते राहुल गांधींच्या मोदी आडनाव प्रकरणी सुरू असलेल्या केसवर देखील बोलले ते म्हणाले की, राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी. काँग्रेस पक्ष पुढचे 100 वर्ष विरोधी पक्षच राहणार आहे. राहुल गांधींनी ओबीसीचा अपमान केल्याची शिक्षा त्यांना मिळणार होती. तर सध्या सुरू असलेल्या ठाकरे गट मनसे एकत्र येण्याच्या चर्चांवर राणे म्हणाले की, संजय राऊत राज-उद्धवला एकत्र येऊ देणार नाही. कारण त्यांच्यामुळेच ते वेगळे झालेले आहेत. अशी टीका त्यांनी यावेळी केली.

संजय राऊत हे काय बोलले?; राज ठाकरेंशी इमोशनल अटॅचमेंट!

दरम्यान सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथा पालथी होत आहेत. त्यामध्ये दररोज घडणाऱ्या नवनवीन घटनांनी राजकीय समीकरणांना वेगळचं रूप मिळत आहे. त्यामध्ये आज पुन्हा उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फुटीने आधीच जर्जर झालेल्या शिवसेनेसाठी (उबाठा) परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. विधानपरिषदेतील उपसभापती निलम गोऱ्हे यांच्यासह ठाकरे गटाचे दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत (शिंदे गट) जाणार असल्याची माहिती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube