Download App

मोदींची टीका त्यांना झोंबली, आता निवडणुकीत कळेलच! बावनकुळेंचा पवारांना इशारा

Chandrashekhar Bawankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन (PM Modi) दिवसांपूर्वी शिर्डीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच शेतकरी मेळाव्यात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले होते, महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर फक्त राजकारण केले. ते अनेक वर्षे केंद्रात कृषिमंत्री होते. परंतु, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले. त्यांच्या याच वक्तव्यावर आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत थेट उत्तर दिले.

कृषिमंत्रिपदाच्या काळात काय निर्णय घेतले, देशाच्या कृषी क्षेत्रात कोणते बदल झाले याची यादीच वाचून दाखवली. पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचे‌ पद आहे. त्यामुळे त्यांनी माहिती देताना नीट द्यायला हवी, असेही पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे  (Chandrashekhar Bawankule) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

Sanjay Raut : शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार? मोदी-शहांचं नाव घेत राऊतांचा गौप्यस्फोट!

बावनकुळे आज भिवंडी शहरात आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या उत्तरावर विचारले. त्यावर बावनकुळे म्हणाले, मोदीजी एका ठराविक विषयावर बोलले होते. पवार साहेबांनी त्यांच्या कृषीमंत्रीपदाच्या काळात अजून काही गोष्टी करता आल्या असत्या पण त्या केल्या नाहीत. त्यामुळे मोदींनी केलेला उल्लेख हा एका ठराविक विषयाला धरून होता. परंतु, मोदींची टीका त्यांना झोंबली आहे. झोंबू द्या. पण, जनतेला सगळं ठाऊक आहे. काल मोदीजींच्या सभेला एक लाखांपेक्षा जास्त लोक होते. त्यामुळे जसजशी निवडणूक जवळ येईल तेव्हा कळेल, अशा शब्दांत बावनकुळे यांनी इशाराच देऊन टाकला.

काय म्हणाले होते मोदी ?

गुरुवारी (26 ऑक्टोबर) शिर्डीमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. “महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते केंद्रात अनेक वर्ष कृषीमंत्री होते, तसं तर व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल मोदी यांनी केला होता.

शरद पवारांचं प्रत्युत्तर काय ?

पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचे‌ पद आहे. त्यामुळे त्यांनी माहिती देताना नीट द्यायला हवी. 2004 ते 2014 मी कृषीमंत्री होतो. मी पदभार घेतला तेव्हा अमेरिकेतून गहू आयात करावा लागत होता. त्यानंतर आम्ही काही निर्णय घेतले. गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस यांच्या हमीभावात दुप्पट वाढ केली. 2004 ते 2014 मध्ये अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतले.

Sanjay Raut : ‘फडणवीस पुन्हा येत असतील तर स्वागतच करू’; राऊतांचा खोचक टोला

2004 साली देशाचा कृषिमंत्री म्हणून मी पहिल्यांदा सुत्रे हाती घेतली, तेव्हा देशात अन्नधान्याची टंचाई होती. भारताला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागत होता. त्या गहू आयातीच्या फाईलवर मी दोन दिवस सही केली नव्हती. शेतकऱ्यांना पीक उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहीत करणे आणि तातडीने पाऊले उचलणे गरजेचे होते. डॉ. मनमोहन सिंहांच्या नेतृत्वाखाली सरकारने त्यावेळी अन्नधान्य, डाळी यांच्या हमी भावात भरीव वाढ करण्याचे ठरवले. हा निर्णय घेतला नसता तर स्थिती बिघडली असती याची माहिती मनमोहन सिंहांनी मला दिली.

Tags

follow us