Download App

Maa Amruta : अमृता फडणवीसांना मॅडम नाही तर, माँ अमृता संबोधणार, भाजप नेत्याचं विधान चर्चेत

'दिव्याज फाऊंडेशनच्या अमृता फडणवीस समुद्रावरील कचरा साफ करतात हे अत्यंत चांगलं काम करता. त्यांनी आता आता राजकारणातील कचराही स्वच्छ करावा.

  • Written By: Last Updated:

Mangalprabhat Lodha :  काल बाप्पाचं भक्तीभावाने विसर्जन करण्यात आलं.  दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी समुद्र किनारा स्वच्छतेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिव्याज फाऊंडेशनने वर्सोवा येथे सकाळी साडेसहा वाजता समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं. (Amrita Fadnavis) या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला. यावेळी भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी अमृता फडणवीस यांचं कौतुक केलं.

RSS Workers : आरएसएस कार्यालयावर पोलिसांचा छापा; संघटनेच्या अनेक प्रचारकांना केली अटक

याबाबत मंगल प्रभात लोढा म्हणाले, ‘दिव्याज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांना मी विनंती करतो की समुद्रावरील कचरा साफ करता हे अत्यंत चांगलं काम करता. आता राजकारणातील कचराही स्वच्छ करावा. अमृता फडणवीसांनी आता माँचं (आईचं) रुप घेतलं आहे. मुलां-मुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यासाठी मी आजपासून त्यांना अमृता मॅडम नाही, माँ अमृता असं संबोधणार आहे, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले. अमृता फडणवीसांच्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभातक लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि अभिनेता आयुष्मान खुराणा उपस्थित होते.

Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

या वक्तव्यामुळे चर्चेत

काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस रोमँटिक नसल्याचं म्हटलं होतं. ‘देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते. लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहेत, त्यांना रोमान्स कळतही नाही आणि जमतही नाही. त्यांना फक्त राजकारण कळतं.’ अमृता फडणवीस यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या.

follow us