Download App

Video : महिला अत्याचार घटना कधी थांबणार?, ‘मविआ’चं संभाजीनगर विमानतळावर PM मोदींविरोधात आंदोलन

छत्रपती संभाजीनगर विमान तळावर पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत निषेध केला.

  • Written By: Last Updated:

Black flags shown to PM Modi In Sambhajinagar Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौऱ्यासाठी जात असताना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच मविआने जवाब दो आंदोलन सुरू केले. (PM Modi) यावेळी पोलिसांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ताब्यात घेतलं. दरम्यान, अंबादास दानवे यांना ताब्यात घेतल्यावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या अटकेसाठी एवढा पोलीस बंदोबस्त का?, आम्ही आतंकवादी आहोत का? असा सवाल त्यांनी केला आहे. तर आम्ही विरोधक असलो तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आम्हालाही काळजी आहे असंही दानवे यावेळी म्हणाले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी अन् महायुती आमनेसामने; बदलापूरच्या घटनेवर वार-प्रतिवार

लोकशाही पद्धतीने आंदोलन करताना अटक का?

आम्हाला आमच्या पंतप्रधानांची काळजी आहे. ते विरोधी पक्षाचे असले तरी आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत. आम्हाला देखील त्यांची काळजी आहे. मात्र, आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना आम्हाला अटक कशाला करता, असा सवाल दानवे यांनी केला आहे. तसंच, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष म्हणाले की, राज्यात आणि देशात महिला अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मात्र केंद्राचे सरकार डोळ्यावर पट्टी बांधून हे सर्व पाहत आहे. त्यामुळे आम्ही देखील तोंडाला पट्टी बांधून सरकारचा निषेध करत आहोत.

माझ्या भाषेत सांगायचं तर त्यांचे सा**च काढून टाकलं पाहिजे; बदलापूर घटनेवर अजितदादांचा संताप

एक तास केले आंदोलन

महिलांच्या घटना कमी होताना दिसत नाहीत त्यामुळे सरकारने यावर पावले उचलावीत यासाठीच हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं नेते सांगत होते. महाविकास आघाडीच्यावतीने विमानतळ रोडवर जवळपास एक तास हे आंदोलन करण्यात आलं. मातोश्री लॉन ते चिकलठाणा विमानतळपर्यंत निषेध व्यक्त करण्यात आला. खबरदारी म्हणून यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

follow us