वंचितने दिला काँग्रेसला धक्का, मुंबईत तब्बल 16 जागांवर उमेदवारच नाही; कारण काय?

BMC Election 2026 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली असून

BMC Election 2026

BMC Election 2026

BMC Election 2026 : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली असून काँग्रेस 167 जागांवर तर वंचित बहुजण आघाडी 62 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र अर्ज भरण्यासाठी काही तास असताना वंचित बहुजन आघाडीने मोठा निर्णय घेत काँग्रेलला तब्बल 16 जागा परत केल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

या जागांवर वंचित बहुजन आघाडीला (VBA) योग्य उमेदवार न मिळाल्याने त्यांनी 16 जागा काँग्रेसला परत केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने 62 पैकी फक्त 46 जागांवरच उमेदवार अर्ज भरला तर 16 जागांवर उमेदवार न मिळाल्याने अर्ज दाखल केला नसल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे अर्ज भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर वंचितकडून याबाबत काँग्रेसला माहिती देण्यात आल्याने या जागांवर काँग्रेलला (Congress) एबी फॉर्म देऊन उमेदवार देता आला नाही. या 16 जागांपैकी काही जागांवर काँग्रेसची चांगली ताकद असताना देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी वंचितच्या मागणीनुसार त्यांना जागा दिल्या होत्या मात्र या ठिकाणी वंचितला उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे आता या 16 जागांवर बंडखोरी करुन अपक्ष उभ्या राहिलेल्या उमेदवारांना काँग्रेस पाठिंबा देत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला युतीसाठी ऑफर दिली होती मात्र शिवसेना ठाकरे गटाने या निवडणुकीसाठी मनसेसोबत युती केल्याने काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार काँग्रेस 1999 नंतर पहिल्यांदाच मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात जास्त जागांवर निवडणूक लढवत आहे. मुंबई महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदार होणार असून 16 जानेवारी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

मोठी बातमी; महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी पक्षाचा महाविकास आघाडीला पाठिंबा

या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युती विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीमध्ये मुख्य लढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Exit mobile version