BMC Election : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणूकीत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या भाजप – शिवसेना शिंदे गटाच्या युतीची आता पिछेहाट होताना दिसत आहे. तर ठाकरे बंधू पुन्हा एकदा कमबॅक करताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत दिसत असल्याने मुंबई महापालिका निवडणूकीत सत्ता कोणाची येणार याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने वंचितसोबत आघाडी केली होती. या आघाडीचा मोठा फायदा काँग्रेसला झाला असून मुंबईत काँग्रेसने आतापर्यंत 22 जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीने जोरदार आघाडी घेत बहुमताचा आकडा गाठला होता मात्र आता या निवडणूकीत नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
रात्री 7.30 पर्यंत आलेल्या निवडणूकीच्या निकालानुसार भाजप आतापर्यंत 82 तर शिवसेना ठाकरे गट 63 आणि शिवसेना शिंदे गट 26 जागावर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 22 आणि एमआयएम 8 जागांवर आघाडीवर आहे.
मुंबई महापालिका निवडणूक निकाल रात्री 7.30 वाजता
भाजप- 82
शिवसेना ठाकरे- 63
शिवसेना- 26
काँग्रेस- 22
एमआयएम–8
समाजवादी पार्टी– 2
मनसे– 7
राष्ट्रवादी- 2
राष्ट्रवादी शरद पवार- 1
अजितदादांशी युती नाहीच; पुणे महापालिका जिंकताच भाजपने घेतला मोठा निर्णय
