मोठी बातमी! विद्यार्थ्यांनो तयारीला लाग; 10 वी अन् 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर

12 वी बोर्ड परीक्षा ही फ्रेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते.

12 The Esxam

12 The Esxam

एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे (SSC) दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावी बोर्ड परीक्षा 10 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. तर दहावी बोर्ड परीक्षा 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवडे आधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.

12 वी बोर्ड परीक्षा ही फ्रेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते, तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Pune) घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वीच्या फेब्रु-मार्च 2026 च्या परीक्षांच्या तारखांबाबत शासनाने परिपत्रक जारी केलं असून परीक्षा लवकर होत आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी आणि माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वी परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा तारखांना आयोजित करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात आढळला या; भयंकर आजाराचा रुग्ण; आरोग्य यंत्रणा झाली सतर्क

यानुसार, 12 वीची लेखी परीक्षा मंगळवार 10 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाईन परीक्षेसह) होणार आहे. तर, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वीची परीक्षा कालावधी शुकवार 20 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 मार्च 2026 रोजी घेण्यात येणार आहेतच.

दरम्यान. शासनाच्या परिपत्रकानुसार 12 वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 23 जानेवारी 2026 ते 9 फेब्रुवारी 2026 दरम्यान होणार आहेत. तर दहावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक श्रेणी व अंतर्गत मूल्यमापन तसेच अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत.

प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षाशुकवार 23 जानेवारी 2026 ते सोमवार 09 फेब्रुवारी 2026 रोजी (माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) सोमवार 02 फेब्रुवारी 2026 ते बुधवार 18 फेब्रुवारी 2026 (शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षेसह) शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करायचे आहे.

या हेतूने तसंच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. उपरोक्त परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. महामंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांच्या सहीने याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

Exit mobile version