बारावी अन् दहावीच्या निकालाबद्दल मोठी बातमी, बोर्डाची संभाव्य तारीख आली समोर

बारावी अन् दहावीच्या निकालाबद्दल मोठी बातमी,  बोर्डाची संभाव्य तारीख आली समोर

Results of 10th and 12th exams : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (exams) गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही धाकधूक पाहायला मिळत आहे. आता नुकतंच दहावी-बारावीच्या निकालाची संभाव्य तारीख समोर आली आहे.

ज्युनियर डॉक्टरांना रॅगिंग  करणं पडलं महागात; थेट मंत्रालयातून आदेश, पुण्यात तीन विद्यार्थी निलंबित

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल येत्या १५ मे पर्यंत तर बारावीचा निकाल साधारणपणे ५ ते १० जून या कालावधीत जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या सर्व विभागीय मंडळांच्या निकालांचा एकत्रित आढावा घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.

यंदा परीक्षा लवकर

यंदा बारावीची परीक्षा दरवर्षीपेक्षा १० दिवस अगोदर झाली होती. ११ फेब्रुवारी ते ११ मार्च या बारावीची परीक्षा झाली होती. तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान पार पडली. या परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित वेळेत सर्व शिक्षकांनी उत्तरपत्रिकांची तपासणी केली. आता सध्या उत्तरपत्रिकांमध्ये कोणता प्रश्न तपासायचा राहिला आहे का?,

उत्तरपत्रिकेवरील गुण आणि गुणपत्रिकेवर घेतलेले गुण बरोबर आहेत का?, याची पडताळणी युद्धपातळीवर सुरू आहे. या पडताळणीनंतर गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना घरबसल्या निकाल पाहता येणार आहे. त्यासाठी काही वेबसाईट बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत.

निकाल कुठे पाहाल?

mahahsscboard.in
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
sscboardpune.in
sscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in

निकाल कसा चेक कराल?

सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर जा.
होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा.
क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी तुमचा सीट क्रमांक टाका. तसेच सोबत आईचे नाव भरुन ‘सबमिट’ बटणवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
या निकालाची प्रत तुम्ही डाऊनलोडही करु शकता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या