Download App

बीड जिल्हा पुन्हा हादरला; मस्साजोगमधील आवादा कंपनीच्या कामगाराचा मृतदेह रस्त्यावर आढळला

पंजाब राज्यातील गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत

  • Written By: Last Updated:

Beed Crime :  केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील एका पंजाब राज्यातील मजुराचा मृत्यू झाला आहे. केज येथील रोडवर संबंधित कामगाराचा मृतदेह सापडला असल्याचं समोर आलं आहे. (Beed) सदर कामगाराचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची हत्या झाल्याने ही कंपनी चर्चेत आली आहे.

विदेशातून फोन करणारा व्यक्ती कराडचा नातेवाईक; चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

पंजाब राज्यातील गुरुदास नावाचा कामगार हा केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे. केज शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे.

दोन सख्ख्या भावांची हत्या

आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात दोन सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे…आपसातील वादातून घडलेल्या या घटनेमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे…दरम्यान पोलिसांनी आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या वाहिरा या गावात आदिवासी समाजातील नातेवाईकात असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे.

या घटनेत अजय भोसले आणि भरत भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्याला अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. खून झालेले दोघे आणि जखमी असलेला कृष्णा हे सख्खे भाऊ आहेत, तर खून झालेले आणि ज्यांनी हल्ला केला या सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. दरम्यान या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी दिली आहे.

बीडला गावठी कट्टे कुठून येतात?

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे, पण जेवढी चर्चा या बीड जिल्ह्याची आहे तेवढीच चर्चा या बीड जिल्ह्यातील पिस्तुल आणि गावठी कट्यांची आहे. पण फक्त बीडच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांत गावठी कट्ट्यांची विक्री वाढली आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतोय मराठवाड्यात गावठी कट्टे नेमके येतात कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

follow us