विदेशातून फोन करणारा व्यक्ती कराडचा नातेवाईक; चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

विदेशातून फोन करणारा व्यक्ती कराडचा नातेवाईक; चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

Walmik Karad : वाल्मिक कराड सध्या एसआयटीच्या कोठडीत आहे. येथे त्याची कसून चौकशी करण्यात (Walmik Karad) येत आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात कराडची चौकशी सुरू आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस स्टेशनबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, चौकशीतून एक मोठी माहिती समोर आली आहे. विदेशातून फोन करणारा व्यक्ती वाल्मिक कराडचाच नातेवाईक असल्याचे आता समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडचे तीन मोबाइल जप्त करण्यात आले होते. या मोबाइलमधील सिमकार्ड विदेशात असल्याची माहिती मिळाली होती. विशेष म्हणजे, या सिमकार्डवरून काही जणांना फोनही करण्यात आले होते. फोन करणारा व्यक्ती हा वाल्मिक कराडचा नातेवाईक असल्याची नवी माहिती समोर आली आहे. या माहितीनंत विदेशात बसलेले व्यक्ती नेमके कोण आहेत याची चर्चा सुरू झाली आहे.

लई धुतल्या तांदुळासारखं आयुष्य जगलोय.. सुरेश धसांचं वाल्मिक कराडच्या पत्नीला उत्तर

वाल्मिक कराडचे आर्थिक व्यवहार पाहणारा व्यक्ती विदेशात आहे अशी माहिती आहे. वाल्मिकच्या जवळच्या नातेवाईकांच्या नावावर विदेशात गुंतवणूक असल्याचंही आता सांगितलं जात आहे. त्यामुळे विदेशात खरंच अशी संपत्ती आहे का याचा शोध तपास यंत्रणांनी सुरू केला आहे. चौकशीतून ही नवी माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. चौकशीतून आणखी काय धक्कादायक माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कराडला मकोका अन् परळी बंद

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई देखील केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला जातोय. कराडवर मकोका लावण्यात (Santosh Deshmukh Case) आला असून त्याच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. यानंतर कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली होती. बीड शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनही केले होते. वाल्मिक कराडची आई आणि पत्नी देखील या आंदोलनात सहभागी होत्या.

मोठी बातमी! वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी, बीड जिल्हा न्यायालयाचा निर्णय

बीड प्रकरणात तपास अधिकारी बदलला

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीचे किरण पाटील करणार आहेत. अनिल गुजर यांच्याकडील तपास किरण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला. मकोका अंतगर्त कारवाई झाल्यास त्याचा तपास डीवायएसपी रँकच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येतो.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube