Download App

ब्रह्मोसचा अभियंता निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा, आयएसआयसाठी केली हेरगिरी

: ब्रह्मोस एरोस्पेसचा (BrahMos Aerospace) माजी अभियंता निशांत अग्रवाल (Nishant Agarwal) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे

BrahMos engineer Nishant Agarwal: ब्रह्मोस एरोस्पेसचा (BrahMos Aerospace) माजी अभियंता निशांत अग्रवाल (Nishant Agarwal) याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी तो दोषी आढळला होता. अग्रवालला 2018 मध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राची माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेला लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. नागपूर सत्र न्यायालयाने (Nagpur Sessions Court) हा बहुप्रतीक्षित निर्णय दिला.

‘आमच्या नादाला लागू नका’, संजय राऊतांचा राणांना थेट इशारा 

निशांत अग्रवालने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रोपरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी ब्रह्मोस एरोस्पेसमध्ये अभियंता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ब्रह्मोस हा प्रकल्प भारत आणि रशियाच्या संयुक्त तंत्रज्ञानावर आधारित होता. ब्रम्होसमध्ये काम करता असतांना महाराष्ट्र एटीएस (दहशतवादविरोधी पथक) आणि उत्तर प्रदेश एटीएसच्या संयुक्त पथकाने ऑक्टोबर 2018 मध्ये निशांतला नागपुरातून अटक केली होती. त्याच्यावर भारताच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील आणि गोपनीय माहिती पाकिस्तानसोबत शेअर केल्याचा आरोप होता.

Box Office Collection : ‘श्रीकांत’ गाजवतोय बॉक्स ऑफिसचं मैदान; जाणून घ्या कलेक्शन… 

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, निशांत अग्रवालवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला संवेदनशील माहिती पाठवल्याचा आरोप आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बनावट आयडीद्वारे पाकिस्तानी एजंट्सच्या संपर्कात असल्याचाही त्याच्यावर आरोप होता. एटीएसचा दावा केला होता की, निशांतने ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान आणि सुरक्षेशी संबंधित डेटासह अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पाकिस्तानला पुरवली.

दरम्यान, अटकेनंतर निशांत अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याच्यावर आयटी ॲक्ट आणि ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता कोर्टाने त्याला निशांतला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

 

 

 

 

 

 

follow us

संबंधित बातम्या