Download App

पूल वाहून गेला! शेती, शिक्षण, रुग्णसेवा ठप्प; शेवगाव तालुक्यात जलसमाधी आंदोलन पेटलं, ग्रामस्थांना संताप अनावर

Villagers Water Immersion Protest In Shevgaon Taluka : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) ग्रामस्थांचा संताप उसळला आहे. वाहून गेलेल्या पुलामुळे वाहतूक ठप्प, रुग्ण-विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचे हाल, तर प्रशासन निष्क्रिय असल्याचा (Water Immersion Protest) आरोप केला जातोय. याच संतापातून ग्रामस्थांनी आज थेट नदीत उतरून जलसमाधी आंदोलन (Bridge Collapsed Heavy Rain) छेडले. परिस्थिती चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

थेट नदीत उतरून जलसमाधी आंदोलन

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील जोहरापूर–देवटाकळी मार्गावरील पूल गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी, विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजला (Water Immersion Protest In Shevgaon) जाण्यासाठी तसेच शेतीमाल बाजारात पोहचवण्यासाठी ग्रामस्थांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी आज थेट नदीत उतरून जलसमाधी आंदोलन छेडले.

भारताच्या मित्र देशात नोकरीची संधी; इस्त्रायलमध्ये ‘या’ जॉबसाठी आताच करा अर्ज

ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये तीव्र वाद

आंदोलनादरम्यान ग्रामस्थ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. ‘जोपर्यंत पुलाचे काम सुरू करण्याचा लिखित आदेश मिळत नाही, तोपर्यंत आम्ही पाण्याबाहेर येणार नाही,’ असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. या दरम्यान आंदोलकांमध्ये महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा सहभाग दिसून आला.

ग्रामस्थांचा आरोप आहे की, हा पूल प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येतो. मात्र, स्थानिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष दिले नाही. वर्षानुवर्षे निधी खर्च होऊनही पायाभूत सुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागतात.

आई तुला हा जावई चालेल का?, अभिनेत्री प्राजक्ता माळीचा आईला प्रश्न, कुणासोबत करणार लग्न?

संघर्ष पेटण्याची शक्यता

घटनास्थळी दाखल झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संतोष पवार यांनी तातडीने परिस्थिती वरिष्ठांना भ्रमणध्वारीद्वारे कळवली. मात्र, ग्रामस्थांनी ‘रोडचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होणार याची स्पष्ट तारीख आणि हमी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,’ असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील चर्चेचा तोडगा निघाला नाही, तर या प्रश्नावरून पुढील काही दिवसांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

follow us