Download App

बीआरएसमधून पंकजा मुंडेंना थेट CM पदाची ऑफर

Pankaja Munde :   तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रामध्ये आपला जम बसविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. महाराष्ट्रातील मराठवाडा या भागात अनेक माजी आमदारांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. या अगोदर त्यांनी नांदेड, संभाजीनगर या ठिकाणी भव्य जाहीर सभा देखील घेतल्या. त्यामुळे महाराष्ट्रातस सध्या केसीआर यांच्या नावाची सर्वत्र चर्चा होते आहे.

यामुळे इतरही पक्षातील अनेक नाराज नेते बीआरएस पक्षाच्या वाटेवर आहेत. त्यातच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत. 27 जून रोजी ते पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेतील. काही दिवसांपूर्वी पंढरपूर येथील दिवंगत माजी आमदार यांचे सुपूत्र भगिरथ भालकेंनी हैद्राबाद येथे जाऊन केसीआर यांची भेट घेतली होती. त्यामुळे या दौऱ्यात त्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.

‘BRS चा रेट ठरलेला, त्यांचं सगळं काही पैशांवरच चालतं’; पटोलेंनी सुरुवातीलाच घेतला पंगा!

या पार्श्वभूमीवर बीआरएस चे समन्वयक बाळासाहेब सानप यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी थेट भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना बीआरएस मध्ये येण्याची ऑफर दिली आहे. बीआरएस मध्ये पंकजा मुंडे आल्यास मुख्यमंत्री होतील, असे ते म्हणाले.

ज्या व्यक्तीने संपूर्ण देशभरामध्ये भाजप रुजविण्याचे काम केले अशा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येवर भाजपमध्ये अन्याय होत आहे. याबाबत केसीआर त्यांच्याशी चर्चा करू. त्यांनी जर बीआरएस मध्ये प्रवेश केला, तर केसीआर साहेब नक्कीच त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करतील असे सानप यांनी म्हटले.

https://letsupp.com/maharashtra/western-maharashtra/sushilkumar-shinde-criticize-to-k-chandrashekhar-rao-on-pandharpur-tour-60453.html

यावर अद्याप पंकजा मुंडे यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. दरम्यान, पंकज मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा कायम होतात. काही दिवसांपूर्वी गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी मी अमित शाहांशी बोलणार असल्याचे म्हटले होते.

Tags

follow us