Download App

Budget 2025 : अर्थसंकल्पामध्ये मोठ्या वल्गना अन् पोकळ घोषणा; राजू शेट्टी यांची जोरदार टीका

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या कापसाला रास्त भाव मिळेल यासाठी ठोस तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली

  • Written By: Last Updated:

Raju Shetti on Union Budget 2025 : काल संसदेत अर्थसंकल्प सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अेक घोषणा केल्या. मात्र, विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका होताना दिसत आहे. (Budget) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे. अर्थसकल्पात पोकळ घोषणा, मोठ्या वल्गना आत्मनिर्भर सारखे शब्द यापलीकडे काहीही नाही नसल्याचं शेट्टींन म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राजू शेट्टी?

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अर्थसंकल्पात पोकळ घोषणा केल्या आहेत. आत्मनिर्भर सारखे शब्द त्यामध्ये आहेत. यापलीकडे त्यामध्ये काहीही नसल्याची टीका राजू शेट्टींन केली आहे. खतांच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी बजेटमध्ये काहीही नाही. कृषी क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. देशात कृषीक्षेत्राचे हब बनवण्याऐवजी पर्यावरणपूरक खेळण्यांचा हब बनवण्याची घोषणा केल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्राला बळकटी; 99,859 कोटींची भरीव तरतूद

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या कापसाला रास्त भाव मिळेल यासाठी ठोस तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली असती तर ती खऱ्या अर्थानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणारी ठरली असती. प्रत्यक्षात मात्र टेक्स्टाईल इंडस्ट्रीसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळं अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांचं भलं होणार असल्याचे भासवलं जात असल्याचे नवले म्हणाले.

12 लाख उत्पन्न कर मुक्त

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सर्वसामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीयांच्यादृष्टीने मोठा निर्णय जाहीर केला. त्यानुसार आता नोकरदारांना 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कुठलाही कर भरावा लागणार नाही. नव्या करप्रणालीनुसार 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर आकारला जाणार नाही. याशिवाय, 75 हजार रुपयांची कर वजावट (Tax Deduction) पकडून आता नोकरदारांना 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर भरावा लागणार नाही.

कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स

० ते ४ – Nil
४ ते ८- ५ टक्के
८ ते १२ लाख – १० टक्के
१२ ते १६ लाख – १५ टक्के
१६ ते २० लाख – २० टक्के
२० ते २४ लाख – २५ टक्के
२४ लाखापुढे – ३० टक्के

follow us