अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्राला बळकटी; 99,859 कोटींची भरीव तरतूद
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज लोकसभेत 2025 साठी अर्थसंकल्प सादर (Budget 2025) केले आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी (Farmers) तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी घोषणांचा पाऊस केला आहे. त्यात आरोग्य क्षेत्राला बळकटी देण्यात आली आहे.
भारताचे बजेट पाकिस्तानपेक्षा तब्बल 11 पटीने जास्त, एका क्लीकवर जाणून दोन्ही देशांमधील फरक
यंदाच्या अर्थसंकल्पामध्येआरोग्य क्षेत्रासाठी तब्बल 99,859 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. जी गेल्या वर्षी म्हणजे आर्थिक वर्ष 2024 25 च्या तुलनेत 9.8 टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी 9406 कोटी, प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनसाठी चार हजार दोनशे कोटी, राष्ट्रीय आरोग्य मोहिमेसाठी 37 हजार 266.92 कोटी, राष्ट्रीय टेली मानसिक आरोग्य कार्यक्रमासाठी 79.6 कोटी तसेच या अर्थसंकल्पामध्ये स्वायत्त संस्थांसाठी 20,046.07 कोटी एवढी तरतूद करण्यात आली आहे.
Union Budget 2025 नंतर ग्रामीण भारताच्या विकासाचा वेग वाढणार? अनेक योजनांच्या घोषणा !
त्याचबरोबर या अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन योजनांची देखील घोषणा करण्यात आली आहे. ज्यामध्ये देशात 200 नवीन कर्करोग केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाने रुग्णालयांमध्ये दहा हजार अतिरिक्त जागा वाढवल्या जातील. तसेच त्यानंतर पुढील पाच वर्षात या जागा 75 हजारापर्यंत वाढवण्याचा सरकारचे उद्दिष्ट आहे.