भारताचा शेजाऱ्यांवर धनवर्षाव! बजेटमध्ये भरीव तरतूद; ‘या’ देशाला मिळणार सर्वाधिक मदत

भारताचा शेजाऱ्यांवर धनवर्षाव! बजेटमध्ये भरीव तरतूद; ‘या’ देशाला मिळणार सर्वाधिक मदत

Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी काल (Union Budget 2025) बजेट सादर केले. त्यांनी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. राज्यांतील विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद केली. त्याचबरोबर केंद्र सरकारने आपल्या या बजेटमधून शेजारी देशांचीही काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शेजारी देशांची मदत करण्यासाठी 5 हजार 483 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे एकूण बजेट 20 हजार 516 कोटी रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊ की केंद्र सरकारने कोणत्या देशाली किती मदत करण्याचा निश्चय या बजेटमध्ये केला आहे.

पक्का मित्र भूतान आघाडीवर

जगात सर्वात आनंदी देश म्हणून ओळखला जाणारा भूतान हा देश भारताचा सख्खा शेजारी आहे. कायमच भारताचा मित्र म्हणून वागत आला आहे. भारतानेही या देशाची मदत करताना कधीच हात आखडता घेतलेला नाही. आताही अर्थसंकल्पात भारताने भूतानची काळजी घेतल्याचे दिसत आहे. भूतानला 2 हजार 150 कोटी रुपये मिळणार आहेत. मागील वर्षात 2 हजार 68 कोटी रुपयांची तरतूद होती. म्हणजेच यंदा मदतनिधीत सरकारने वाढ केली आहे. या मदत निधीच्या माध्यमातून भूतानमध्ये मुलभूत सुविधा, जलविद्यूत योजना आणि आर्थिक सहकार्याला चालना देण्यात येणार आहे.

Union Budget 2025 नंतर ग्रामीण भारताच्या विकासाचा वेग वाढणार? अनेक योजनांच्या घोषणा !

मालदिवलाही झुकतं माप

केंद्र सरकारने या बजेटमध्ये मालदिवलाही सहकार्याची भूमिका घेतली. मालदीवने काही दिवसांपूर्वी भारत विरोधाची भूमिका घेतली होती. हा देश चीनकडे झुकला होता. त्यामुळे भारत आणि मालदीवच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. परंतु, आता हा तणाव बऱ्यापैकी निवळला आहे. यानंतर भारताने मोठं मन दाखवत मालदीवसाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे. मालदीवसाठी 400 कोटींवरून 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानच्या मदतीत घट

अफगाणिस्तानात सध्या तालिबान्यांचं सरकार आहे. त्यामुळे या सरकारशी भारताचा संवाद कमी झाला आहे. त्याचा परिणाम भारताच्या अर्थसंकल्पातही दिसून आला आहे. अफगाणिस्तानच्या मदतीत कपात करण्यात आली आहे. मागील वर्षी अफगाणिस्तानला 200 कोटी रुपये मदत निधी देण्यात आला होता. 2025-26 मध्ये मात्र ही रक्कम 100 कोटी करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानला 207 कोटी रुपये देण्यात आले होते. सध्या भारताने या देशाशी मानवीय सहायता आणि आर्थिक सहकार्य या बाबतीतच संपर्क ठेवला आहे.

भारताचे बजेट पाकिस्तानपेक्षा तब्बल 11 पटीने जास्त, एका क्लीकवर जाणून दोन्ही देशांमधील फरक

म्यानमारच्या मदतीत वाढ

म्यानमारसाठी भारताने यंदा वेगळा विचार केला आहे. 2024-25 च्या अर्थसंकल्पात 250 कोटी रुपयांची तरतूद होती. 2025-26 मधील अर्थसंकल्पात यात वाढ करून 350 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या देशातील परिस्थिती सध्या अराजकतेची आहे. त्यातच भारताने दोन्ही देशांच्या सीमेवर लोकांच्या येण्या जाण्याच्या संबंधित नियम अधिक कठोर केले आहेत. या नव्या नियमानुसार दोन्ही बाजूंकडून फ्री मूव्हमेंट रिजीम अंतर्गत 16 ते 10 किलोमीटर पर्यंत वर्दळीस मनाई आहे.

बाकीच्या देशांचं काय

भारताने नेपाळसाठी बजेट 700 कोटी कायम ठेवले आहे. नेपाळही मागील काही दिवसांपासून चीनकडे झुकू लागला आहे. आर्थिक संकटाने हैराण झालेल्य श्रीलंकेच्या मदतीसाठी भारत सरकारने बजेटमध्ये 300 कोटींची तरतूद केली आहे. याही मदतीत वाढ करण्यात आली आहे. बांग्लादेशातील सत्ता पालटानंतर भारत आणि बांग्लादेशचे संबंध अतिशय खराब झाले आहेत. बांग्लादेशात अल्पसंख्यांकावर सातत्याने हल्ले होत आहेत. तरी देखील केंद्र सरकारने बांग्लादेशला मिळणारी मदत कायम ठेवली आहे. बांग्लादेशला मिळणारी 120 कोटी रुपयांची मदत अपरिवर्तित राहिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube