Video: यंदाचा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडं नेणारा; लोकसभेत सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्पाचं वाचन

  • Written By: Published:
Video: यंदाचा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडं नेणारा; लोकसभेत सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्पाचं वाचन

Union Budget 2025 Update : आज देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत सादर करत आहेत . त्यासाठी त्यांनी लोकसभेत अर्थसंकल्पाचे वाचन सुरु केले आहे. (Union Budget) निर्मला सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडे नेणारा असल्याचे म्हटले.

Budget 2025 LIVE : शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा; मखाना बोर्ड, KCC लिमिट 5 लाखांवर

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषांची सुरुवात सरकारचे उद्दिष्ट सब का विकास हेच असल्याचे म्हटले. तसेच देश म्हणजे केवळ जमीन नाही तर म्हणजे जनता असल्याचे त्या म्हणाल्या. निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, आमचे लक्ष ‘ज्ञान’ वर आहे. तसेच १० वर्षांत आपण बहुआयामी विकास साधला असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या प्रगतीचा आलेख सादर केला.त्यासोबतच त्यांनी येणाऱ्या काळात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अर्थव्यवस्थेला चालना देऊ. अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

विकसित भारताच्या संकल्पनेतून प्रेरणा

2025-26 चा अर्थसंकल्प सादर करतोय विकासाचा वेग वाढवणे, सुरक्षित सर्वसमावेशक विकास, खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन, वाढत्या मध्यमवर्गासाठी तरतूद करणार आहोत.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात सरकारची वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे. विकसित भारताच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन 21 व्या शतकातील पहिली 25 वर्षे पूर्ण केली तसेच पुढची पाच वर्ष देशासाठी संधी असल्याचे त्यांनी म्हटले. सबका विकास ,सर्वसमावेशक विकास, सर्व भागांचा विकास यासाठी पाच वर्षे महत्त्वाची असल्याचेही त्यांनी म्हटले.

विकसित भारताच्या संकल्पेत यांचा समावेश

विकसित भारत संकल्पना

शून्य गरिबी,

100 टक्के उच्च दर्जाचं शिक्षण,

उच्च दर्जाची आरोग्य व्यवस्था,

आर्थिक क्षेत्रांमध्ये 70 महिलांचा सहभाग,

जगाचं फुड बास्केट भारताला बनवणार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube