Video : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून डीप टेकसाठी निधीची घोषणा; डीप टेक म्हणजे काय?

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटलं आहे की, सरकार खासगी क्षेत्रातील संशोधन आणि विकास आणि नवनिर्मितीसाठी 20 हजार

  • Written By: Published:
Union Budget : अर्थसंकल्पात डीप टेकसाठी निधीची घोषणा; डीप टेक म्हणजे काय?

Union Budget 2025 Deep Tech : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी डीप टेकसाठी निधीची घोषणा केली आहे. (Budget ) डीप टेकमध्ये अनेक गोष्टी येतात. या अर्थसंकल्पात टेक आणि इनोव्हेशन क्षेत्रात काय घोषणा करण्यात आल्या आहेत ते जाणून घेऊया.

मोठी बातमी! देशात नवीन इनकम टॅक्स कायदा; पुढील आठवड्यात विधेयक होणार सादर

निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की सरकार सखोल तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी निधीचा निधी स्थापन करेल. केंद्र सरकार पुढील 5 वर्षांत IIT आणि IISc मध्ये तंत्रज्ञानावरील संशोधनासाठी 10 हजार फेलोशिप देणार आहे.

निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात म्हटलं आहे की, सरकार खासगी क्षेत्रातील संशोधन आणि विकास आणि नवनिर्मितीसाठी 20 हजार कोटी रुपये देणार आहे. यासोबतच त्यांनी डीप टेकसाठी निधीची घोषणाही केली आहे.

अर्थमंत्र्यांनी ही घोषणा अशा वेळी केली आहे, जेव्हा सखोल तंत्रज्ञान क्षेत्रात फारच कमी गुंतवणूक केली जात आहे. कमी गुंतवणुकीचे प्रमुख कारण म्हणजे डीप टेक स्टार्ट-अप्सनी स्वत:ला स्थापित करण्यासाठी लागणारा वेळ.

डीप टेक म्हणजे काय?

डीप टेक (डीप टेक्नॉलॉजी) ही अत्याधुनिक वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी प्रगतीवर आधारित नाविन्यपूर्णतेसाठी वापरली जाणारी संज्ञा आहे. डीप टेक केवळ सॉफ्टवेअर आधारित किंवा ग्राहक केंद्रित तंत्रज्ञानाबद्दल बोलत नाही. हे तंत्रज्ञान तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. यामध्ये अनेक वर्षे संशोधन आणि विकास करावा लागतो.

follow us