मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज अधिवेशनात सादर केलेला अर्थसंकल्प चुनावी जुमला या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला असून राज्यातील एकूणच परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून सर्व क्षेत्र आणि घटकांसाठी तरतूद केल्याचं दिसून येत आहे. मात्र, विरोधकांनी अर्थसंकल्पावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
Maharashtra Budget 2023 : फडणवीसांचे असेही ‘मोदी प्रेम’, थेट त्यांच्याच नावानी केली नवी योजना
अजित पवार म्हणाले, यंदाच्या अर्थसंकल्पात कुठलीही अतिशोयक्ती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फक्त घोषणा दिल्या मात्र अर्थसंकल्पात साधा उल्लेखही केला नसल्याचं अजित पवारांनी म्हटंलय. तसेच महापुरुषांच्या स्मारकाबाबत घोषणा केल्या पण नेमकी काय तरतूदी केल्या आहेत हे सरकारने स्पष्ट केलेले नाही.
तसेच महाविकास आघाडी सरकारने याआधी सादर केलेल्या बाबीच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दिसून आल्या आहेत. आम्ही पंचसुत्री मांडली यांनी तर पंचामृत मांडली, या शब्दांत पवार यांनी अर्थसंकल्पावर टीका केलीय.
मी अमृताकडे वळतो, अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस म्हणाले सभागृहात हशा पिकला, काय होता किस्सा?
मागील अनेक वर्षांतलं राज्याचं उत्पन्न जर पाहिलं तर लक्षात येईल की, हा तर चुनावी जुमला असल्याचा अर्थसंकल्प आहे. राज्यातील जनतेला स्वप्नांच्या दुनियेत फिरवणारा अर्थसंकल्प असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलय.
शेतकऱ्यांच्या वीजपंपाबात सरकाकडून एकही घोषणा नाही. सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांनी 6 हजारांची मदत जाहीर केलीय. 6 हजार रुपये प्रमाणे विचार केला तर एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्याला 3 तीन रुपये रोज मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी अशी तुटपूंजी मदत सरकार करत आहे. शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत नको त्यांच्या पिकाला चांगला दर द्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
Maharashtra Budget 2023 : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी मोठी घोषणा
शेतकऱ्यांबाबत गुजरात सरकारने जशा घोषणा केल्या आहेत, अगदी तशाच घोषणा करुन बळीराजाला मदत करण्याच आवाहनही अजित पवारांनी यावेळी केलं आहे. यासोबत महिला दिनानिमित्त सरकार काहीतरी मोठ्या घोषणा करतील अशी आशा होती, मात्र, महिलांसाठीही म्हणाव्या तशा घोषणा सरकारने केल्या नसल्याचं त्यांनी म्हटंलय.
दरम्यान, राज्यावर साडेसहा लाख कोटींपेक्षाही अधिक कर्ज असून राज्याची परिस्थिती पाहता राज्य कर्जबारीकडे वाटचाल करीत असल्याचंही ते म्हणालेत. 1 एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणात विजेच्या दरात वाढ होणार असल्याचे संकेतही अजित पवारांनी दिले आहेत. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पाबाबत दोन दिवसांनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचा इशाराही त्यांनी विरोधकांनी दिला आहे.