Maharashtra Budget 2023 : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी मोठी घोषणा
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. या वेळी फडणवीसांनी राज्यात 14 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये बांधणार असल्याची मोठी घोषणा केली. ही महाविद्यालये राज्यातील सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) येथे बांधली जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले तसेच मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे स्थापन करणार असल्याचे सांगितले.
Maharashtra Budget 2023 : धनगर बांधवांसाठी मोठी घोषणा! महामंडळाचं मुख्यालय अहमदनगरला…
तसेच राज्यातील विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली. यामध्ये डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ यांचा समावेश आहे. वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान दिले जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.
नवीन पाच महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळाला मिळणार ‘एवढा’ निधी
तसेच लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा दिला जाणार आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.