Maharashtra Budget 2023 : नवीन पाच महामंडळांची घोषणा, प्रत्येक महामंडळाला मिळणार ‘एवढा’ निधी
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विधानसभेत सादर करत आहेत. यावेळी त्यांनी सांगितले राज्यात भरीव निधी देऊन नवीन पाच महामंडळांची स्थापना करण्यात येणार आहे. या महामंडळांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मानधनात भरीव वाढ
यामध्ये महामंडळामध्ये असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, असे पाच नवीन महामंडळे स्थापन करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.असे फडणवीस म्हणाले.
याच बरोबर विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी दिला जाणार आहे. यामध्ये – बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळाचा समावेश करण्यात आला आहे.
Maharashtra Budget 2023 : राज्यातील मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; फडणवीसांची घोषणा
याचा बरोबर यामध्ये संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.
या सर्व संस्थाना भरीव निधीच्या स्वरूपात प्रत्येकी 50 कोटी रुपये निधी दिला जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.