Maharashtra Budget 2023 : गरिबांसाठी मोठी घोषणा, आता 5 लाखांपर्यंत महात्मा फुले योजनेत उपचार करता येणार
Maharashtra Budget : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. राज्यातील नागरिकांसाठी राज्य सरकारतर्फे महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना राबवण्यात येते. या योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे.
राज्य सरकार तर्फे नागरिकांना आरोग्यासंदर्भात अडचण येऊ नये म्हणून महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजना राबवण्यात येते. या योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांपर्यंत होते. परंतु त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत आता 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार करता येणार असल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच या योजनेत नवीन 200 रुग्णालयांचा समावेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Maharashtra Budget 2023 : अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी; मानधनात भरीव वाढ
याचबरोबर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत केले जाणार आहे. तसेच राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केले जाणार असल्याची माहिती फडणवीसांनी आज अर्थसंकल्प सादर करताना दिली आहे.\
Maharashtra Budget 2023 : शेतकर्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने मदत; फडणवीसांची घोषणा
दरम्यान, अर्थसंकल्पात फडणवीस यांनी अशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये, गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये करण्यात येणार आहे. याशिवाय अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये करण्याची घोषणा करण्यात आली आहे.