Maharashtra Budget 2023 : फडणवीसांचे असेही ‘मोदी प्रेम’, थेट त्यांच्याच नावानी केली नवी योजना

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांचे असेही ‘मोदी प्रेम’, थेट त्यांच्याच नावानी केली नवी योजना

Maharashtra Budget 2023 : शिंदे- फडणवीस सरकाराच पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=N_-NCOncia8

PM आवास योजनेंतर्गत ओबीसींसाठी 10 लाख धरणाची तरतूद करण्यात आली. विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी मंजूर करण्यात आली. यावरून फडणवीसांचे थेट मोदी प्रेम यातून दिसून आले आहे.

मी अमृताकडे वळतो, अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस म्हणाले सभागृहात हशा पिकला, काय होता किस्सा?

संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून देणार आहेत. तर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये तरतूद करण्यात आली.

Maharashtra Budget 2023 : फडणवीसांची मोठी घोषणा ! खेळाडूंसाठी नवीन क्रीडा विद्यापीठ

तसेच ‘मोदी आवास घरकुल योजना’ सर्वांसाठी घरे…यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आणि इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’ आखण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजना 4 लाख घरे (2.5 लाख घरे अनुसूचित जाती- जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग) तर रमाई आवास 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये (किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी) आणि शबरी, पारधी, आदिम आवास 1 लाख घरे/1200 कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत 50,000 घरे/600 कोटी (25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर 25,000 घरे) तर इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना 3 वर्षांत 10 लाख घरे /12,000 कोटी (या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार/3600 कोटी रुपये) असा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube