Maharashtra Budget 2023 : फडणवीसांची मोठी घोषणा ! खेळाडूंसाठी नवीन क्रीडा विद्यापीठ

Maharashtra Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात सरकारने घोषणांचा पाऊस पाडला आहे. शेतकरी, कामगार, नोकरदार महिला, अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पात खेळाडूंसाठीही काही घोषणा करण्यात आल्या आहेत. खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार आहे.
खेळाडूंची कामगिरी उंचावण्यासाठी मिशन लक्षवेध कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येईल. बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारणार आहे. त्यासाठीही कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येईल. या व्यतिरिक्त महत्वाचे म्हणजे पुण्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार आहे. यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
Maharashtra Budget 2023 : राज्यातील रस्त्यांसाठी आणि मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा
अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देऊन अनुदान देण्यात येणार आहे. नागपूर विभागीय क्रीडा संकुलासाठीही 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी या अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी या घोषणा प्रत्यक्षात केव्हा येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यंदाचा अर्थसंकल्प हा जनभागीदारीतून तयार केलेला पहिला अर्थसंकल्प आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सूचना मागवल्यानंतर ७ दिवसात ४० हजार सूचना आल्या आहेत.
मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी
– श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन क रणार
– विश्वकोष कार्यालय वाई (सातारा), मराठी भाषा भवन, ऐरोली येथे इमारतींची कामे
– मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी मराठी भाषा युवक मंडळे
– सांगली नाट्यगृहासाठी 25 कोटी रुपये
– राज्यातील सर्व नाट्यगृहांच्या दुरुस्तीसाठी : 50 कोटी रुपये
– दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव, कोल्हापूर चित्रनगरी येथे आंतरराष्ट्रीय सुविधांसाठी : 115 कोटी रुपये
– कलाकार आणि कलाप्रकार जतनासाठी महाराष्ट्र कलाकार कल्याण मंडळाची स्थापना
– विदर्भ साहित्य संघाला शताब्दीनिमित्त : 10 कोटी रुपये
– स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी आता 50 कोटी रुपयांचा