Maharashtra Budget 2023 : राज्यातील रस्त्यांसाठी आणि मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Budget 2023 : राज्यातील रस्त्यांसाठी आणि मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Budget 2023 : शिंदे- फडणवीस सरकाराच पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात आहे. यामध्ये पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई- पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी देण्यात येणार आहे. विरार- अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आली.

https://www.youtube.com/watch?v=N_-NCOncia8

रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी तसेच हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते /90,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते/4000 कोटी रुपये आणि रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्‍यांची कामे करण्यात येणार आहे. जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग- 4500 कि.मी./3000 कोटी रुपये, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना- 6500 कि.मी. तर मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना आखण्यात आली. सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना तरतूद करण्यात आली.

500 कोटींचा घोटाळा दडपण्याचा शिंदे-फडणवीसांचा डाव; अजितदादांचा गंभीर आरोप

मेट्रो प्रकल्पासाठी मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला करण्यात आला. मुंबईतील नवीन प्रकल्प मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी मंजूर करण्यात आले आहे. मुंबई मेट्रो 11- वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस\ 12.77 कि.मी/ 8739 कोटी रुपये तर मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये करण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा-० 43.80 कि.मी./6708 कोटी, पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर अन्य नवीन प्रकल्प- ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रोची तरतूद करण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube