Maharashtra Budget 2023 : आता सर्वांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम

Maharashtra Budget 2023 : आता सर्वांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार; 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम

मुंबई : राज्यातील (Maharashtra)सर्व नागरिकांचं आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्याचं कारण म्हणजे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget Session)अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी राज्यात 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं आता राज्यातील प्रत्येक नागरिकाचं आपल्या डोक्यावर छत असण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे.

फडणवीसांनी अर्थसंकल्पामध्ये यंदा 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची मोदी आवास घरकूल योजना राबवली जाणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 4 लाख घरं तयार केली जाणार आहेत. त्यातील 2.5 लाख घरं ही अनुसूचित जाती आणि जमातीसाठी तर 1.5 लाख इतर प्रवर्गासाठी असणार आहेत.

Maharashtra Budget 2023 : धनगर बांधवांसाठी मोठी घोषणा! महामंडळाचं मुख्यालय अहमदनगरला…

रमाई आवास योजनेंतर्गत 1.5 लाख घरे बांधली जाणार आहेत त्यासाठी 1800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधील किमान 25 हजार घरं ही मातंग समाजासाठी राखीव असणार आहेत. शबरी, पारधी, आदिम आवास योजनेंतर्गत 1 लाख घरं बांधली जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत 50 हजार घरं बांधली जाणार आहेत. त्यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील 25 हजार घरं विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी आणि धनगर समाजासाठी 25 हजार घरं असणार आहे.

इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकूल योजना आणली आहे, ही मोदी आवास घरकूल योजना राबवली जाणार आहे. पुढील 3 वर्षांत 10 लाख घरं बांधली जाणार आहेत. त्यासाठी 12 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत यंदा 3 लाख घरं बांधली जाणार आहेत. त्यासाठी 3600 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube