राष्ट्रवादीने घेरलेल्या भुसेंच्या मदतीला शंभूराज देसाई; राऊतांनाही दिले चॅलेंज..

Budget Session : मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज विधानसभेत (Budget Session) जोरदार खडाजंगी झाली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र त्यांचे सहकारी मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोर्चा सांभाळला. विरोधकांना उत्तरे देत थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच आव्हान दिले. खासदार संजय राऊत […]

Desai

Desai

Budget Session : मंत्री दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आज विधानसभेत (Budget Session) जोरदार खडाजंगी झाली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र त्यांचे सहकारी मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मोर्चा सांभाळला. विरोधकांना उत्तरे देत थेट संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच आव्हान दिले.

खासदार संजय राऊत यांनी मंत्री भुसेंवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना उत्तर देताना भुसेंनी सांगितले की आम्हाला वारंवार गद्दार म्हणणारे आणि आमच्याच मतांवर राज्यसभेवर निवडून गेलेल्या संजय राऊतांनी काल एक ट्विट केले. या ट्विटची चौकशी करावी. जर मी दोषी आढळलो, तर आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल. जर यात खोटं आढळून आलं तर या महागद्दाराने राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा.

वाचा : काय मांडायचंय ते मांडा पण.., अजितदादा भुसेंवर का चिडले?

हे भाकरी मातोश्रीची खातात आणि चाकरी राष्ट्रवादी आणि शरद पवारांची करतात. यावेळी बोलताना भुसे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले. त्यांनी आणि अन्य आमदारांनी आक्षेप घेत गोंधळ घातला.

त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई भुसेंच्या मदतीला आले. ते म्हणाले, दादा भुसेंना शरद पवारांचा कोणताही अपमान करायचा नव्हता. शरद पवार यांच्याबद्दल महाराष्ट्रासह देशाला आदर आहे. त्यांनी राज्याचे नेतृत्व देशात केले. कृषीमंत्री म्हणून त्यांनी घेतलेले राज्याच्या हिताचे अनेक निर्णय आम्हाला माहिती आहेत. पण, संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत आणि आता आम्हाला काहीही बोलतात. त्यांच्याबद्दल आहे, असे देसाई म्हणाले.

Maharashtra Assembly : दादा भुसेंनी संजय राऊतांची थेट चाकरीच काढली..

शरद पवार यांच्याबद्दल दादा भुसेंनी अनुद्गार काढलेले नाहीत. मात्र, आमच्याबद्दल कोणी काही बोलले तर आम्ही सहन करणार नाही. संजय राऊत यांना आमच्याबद्दल वक्तव्य करण्याचा अधिकार नाही. संजय राऊत यांच्यात हिंमत असेल तर राजीनामा देत परत निवडून यावे, असे आव्हान शंभूराज देसाई यांनी राऊतांना दिले.

Exit mobile version