काय मांडायचंय ते मांडा पण.., अजितदादा भुसेंवर का चिडले?

मुंबई : संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर मंत्री दादा भुसे आज विधानसभेच चांगलेच तापल्याचं पाहायला मिळालेत. दादा भुसेंनी थेट शरद पवारांची चाकरी करत असल्याचं संजय राऊतांना म्हंटलंय. त्यावर विधानसभेत अजित पवार दादा भुसेंवर चांगलेच चिडल्याचं दिसून आलं.
लोकसभा निवडणुकीचा फायदा-तोटा पाहूनच राज्यात निवडणुकीचे रणशिंग !
अजित पवार म्हणाले, सभागृहात प्रत्येकाला आपली भूमिका मांडाण्याचा अधिकार आहे. तसंच दादा भुसेंनीही त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर आपली काय भूमिका मांडायचीय ते मांडा पण यामध्ये आमचे राष्ट्रीय नेते शरद पवारांचं नाव घेण्याचं काहीच काम नसल्याचं अजित पवार दादा भुसेंना उद्देशून म्हंटले आहेत.
भाकरी मातोश्रीची खातात अन् चाकरी शरद पवारांची करत असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उद्देशून थेट विधानसभेत म्हटलं आहे. संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दादा भुसेंवर घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. चौकशीत आरोप जर खरे निघाले तर आमदारकीचाच नाहीतर राजकारणातून राजीनामा देणार असल्याचं चॅलेंजही त्यांनी यावेळी दिलंय.
मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून गिरणा अॅग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स गोळा केले आहेत. पण संबंधित कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवण्यात आले आहेत. ही एक मोठी लूट असून त्याचा लवकरच स्फोट होणार असल्याचं संजय राऊतांनी ट्विटद्वारे म्हटलंय.
दरम्यान, दादा भुसेंनी थेट शरद पवारांची चाकरी करत असल्याचं म्हटल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सभागृहात एकच गोंधळ केला होता. यामध्ये शरद पवारांना घेण्याचं काही काम नसल्याच सूर राष्ट्रवादीच्या आमदारांनी लावला होता.