Buldhana News : ताटात उष्टे अन्न ठेवले, या किरकोळ कारणावरून मुलाने स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. त्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पूर्णा नदीत टाकल्याची धक्कादायक घटना संग्रामपूर (Sangrampur) तालुक्यातील बोडखा येथे 13 ऑगस्ट रोजी घडली असून, ती 19 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या प्रकरणी मृतकाची सुन व आरोपीची पत्नी हिनेच पोलिसात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोडखा येथील रामराव तेल्हारकर असे मृतकाचे नाव असून, आरोपी मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर याने हे भयानक कृत्य केले.
“काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस” असे म्हटल्याने वडील व मुलामध्ये वाद झाला होता. त्यानंतर ताटात उष्टे अन्न ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर क्रूर हिंसाचारात झाले आणि रागाच्या भरात शिवाजीने वडिलांवर कुऱ्हाडीचा वार करत त्यांचा खून केला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मात्र घटनेतील मृतकाचा मृतदेह अद्याप पर्यत मिळालेले नाही हे विशेष.
तर घटना लपवण्याच्या प्रयत्न अपयशी ठरल्याने तब्बल सहा दिवसानंतर अर्थात 19 ऑगस्ट रोजी पोलिसांना या घटनेचा उलगडा झाला. तालुक्यातील ग्राम बोडखा येथील रहिवासी रामराव तेलारकर यांनी त्यांचा मुलगा शिवाजीला हत्या लपवण्यासाठी शिवाजी व त्याचा मुलगा कृष्णा या दोघांनी मिळून मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून दुचाकीवर तालुक्यातील खिरोडा पुलाजवळ नेला आणि पूर्णा नदीत फेकून दिला.
बनावट आवाज, डीपफेक व्हिडिओ अन् वेबसाइट्स.. सावध व्हा, AI ही देऊ शकतो दगा!
या घटनेची माहिती काही दिवसांपर्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. मात्र अखेर रामराव यांची सून योगिता शिवाजी तेलारकर हिने तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पो या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत. पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टिमला घटनास्थळी पाचरण करून या घटनेचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.