Coldplay तुफान क्रेझ अन् ‘बुक माय शो’ ची थेट पोलिसात धाव
BookMyShow : कोल्डप्ले (Coldplay) भारतात 09 वर्षानंतर येत आहे. हा एक ब्रिटीश रॉक बँड असून संपूर्ण जगातील सर्वात यशस्वी बँडपैकी एक आहे. कोल्डप्लेने आतापर्यंत 300 हून अधिक पुरस्कार जिंकले आहेत. या बँडची फॅन फॉलोइंग इतकी मोठी आहे की भारतात (India) त्याच्या कॉन्सर्टची तिकिटे काही वेळातच विकली गेली. त्यामुळे अनेक चाहत्यांना या कॉन्सर्टचे तिकटी मिळाले नाही.
या कॉन्सर्टचे तिकटी बुक माय शोवर (BookMyShow) उपलब्ध करण्यात आले होते मात्र पुन्हा एकदा बुक माय शोची वेबसाईट क्रॅश झाल्याने चाहते संताप व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे बुक माय शोने आता तिकीट स्कॅल्पिंगचा विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. Viagogo प्लॅटफॉर्म आणि या सारख्या प्लॅटफॉर्मवर तिकिटे वाढलेल्या किमतीत पुन्हा विकली जात असल्याचा आरोप बुक माय शोने केला आहे. त्यांनी चाहत्यांना या प्लॅटफॉर्मवरून तिकिटे खरेदी करणे टाळण्याचे आवाहन केले.
कोल्डप्ले इंडिया टूर तिकिटांच्या पुनर्विक्रीबाबतच्या अधिकृत निवेदनात प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की, कोल्डप्लेच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर 2025 च्या पुनर्विक्रीच्या उद्देशाने Viagogo आणि Ginsberg किंवा थर्ड पार्टी पासून कोणत्याही तिकीट विक्री/पुनर्विक्रीच्या प्लॅटफॉर्मशी बुक माय शो चा कोणताही संबंध नाही. अशी माहिती बुक माय शोने आपल्या निवेदनात दिली आहे.
One Nation One Ticket🤡 #Coldplay pic.twitter.com/bnX4beu7kr
— Rishi Bagree (@rishibagree) September 22, 2024
मुंबई पोलिसांची पोस्ट
कोल्डप्लेच्या कॉन्सर्ट तिकिटांची ब्लॅकमध्ये विक्री होत असल्याबाबत मुंबई पोलिसांनी देखील एक पोस्ट जारी केली आहे. मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे काळ्या बाजारात तिकिटे खरेदी करणे किंवा विक्री करणे तुम्हाला अडचणीत आणू शकते, त्यामुळे फक्त विश्वसनीय स्रोतांकडून तिकटी खरेदी करा. अशी पोस्ट मुबई पोलिसांनी केली आहे.
‘लोक म्हणत होते त्याला जन्मठेप द्या पण…’, अजित पवारांचे बदलापूर एन्काऊंटरवर रोखठोक मत
बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शका करण जोहरलाही या कॉन्सर्टचा भाग व्हायचं होतं, पण त्याला तिकीट मिळालं नाही. त्याने याबाबत आपल्या इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. 18, 19 आणि 21 जानेवारी 2025 रोजी मुंबईच्या DY पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर कोल्डप्लेच्या इंडिया टूर 2025 होणार आहे. मात्र सध्या सर्व्हर क्रॅश आणि वेटिंग लिस्टमुळे चाहत्यांना तिकीट मिळत नसल्याने चाहते सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात तक्रार करत आहे.