Download App

Video : उद्योजकाचा मित्रानेच केसाने गळा कापला; छ. संभाजीनगरमधील ‘त्या’ दरोड्यात मोठी अपडेट

काही महिन्यांपूर्वी लड्डा यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यावेळी जवळचा असलेला बालासाहेब इंगोले गावी भेटायला गेला. कंपनीत

Theft at Businessman Santosh Ladda House : छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा दरोडा पडला. (Sambhajinagar) त्यामध्ये आता काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात दूसरा तिसरा कुणी नाही तर संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र निघाला आहे. या व्यक्तीने संतोष लड्डासोबतच शिक्षण घेतलं असून ते लड्डा यांचा अत्यंत विश्वासू मित्र असल्याचं समोर आलंय. या घटनेबाबत पोलीस आयुक्त प्रशांत स्वामी यांनी संपूर्ण माहिती दिली.

या मित्राच नाव बालासाहेब चंद्रकांत इंगोले असं आहे. यांनीच दरोडासंदर्भात पहिली टीप दिली असल्याचं समोर आलं आहे. डिसेंबर महिन्यात संतोष लड्डा किरकोळ कारणावरून रागावल्यानं बालासाहेब रागावले होते. त्याच रागातून पुढे जाऊन त्यांनी ही माहिती पुरवल्याचे आता बोलले जाऊ लागलंय. दरम्यान, या प्रकरणाचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या घरावर दरोडा, डोक्याला बंदूक लावून लुटली कोट्यावधींची संपत्ती

काही महिन्यांपूर्वी लड्डा यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यावेळी जवळचा असलेला बालासाहेब इंगोले गावी भेटायला गेला. कंपनीत काहीही न सांगता तो गेला आणि कंपनीत गैरहजर असल्याने त्यावर कंपनीतून त्याला कॉल केले गेले. त्याने ते कॉल उचलले नाहीत. नंतर ज्यांनी कॉल केले त्यांना शिवीगाळ केली. दरम्यान, सव्वा महिन्यानंतर लड्ड्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी कॉल करणारे हे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्याशी असं वागणं बरं नाही, त्यांची माफी मागायला सांगितली आणि हा राग त्याच्या मनात होता.

कोण आहेत बालासाहेब इंगोले?

बालासाहेब चंद्रकांत इंगोले कंपनीमध्ये कटिंग इंचार्ज असून जवळचा मित्र आहे. त्यांनी सोबत शिक्षण घेतलं होतं. 20 वर्षांपासून त्यांच्या कंपनीत काम करत होता. त्याच्या घरी भाजीपाला घेवून जात होता. त्याला घरातल्या पैसे आणि सोन्याची माहिती होती. त्यावरून त्याने पहिली टीप दिली.

दरोड्याप्रकरणी आणखी चार जणांना अटक

1. बालासाहेब चंद्रकांत इंगोले , वय 46 वर्ष, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. सूर्यवंशी नगर सिडको वाळूज महानगर एक ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर

2. आजिनाथ पुंजाराम जाधव, वय 22 वर्ष, व्यवसाय किराणा दुकान रा. सिडको वाळूज महानगर एक ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर

3. गणेश गंगाधर गोराडे, वय 22 वर्ष, व्यवसाय खा नोकरी, रा. सिडको वाळूज महानगर एक जिजामाता नगर, ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर

4 महेश दादाराव गोराडे, वय 26 वर्ष, व्यवसाय मेडिकल चालक, रा. वडगाव कोल्हाटी ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर

 

 

follow us