Download App

…तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोल?, परप्रांतीय व्यापाऱ्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज

आता एका गुंतवणूकदाराने ट्वीट करत थेट मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली आहे. तसंच, त्याने जे ट्वीट केलं आहे त्यामध्ये

Sushil Kedia Tweet on Raj Thackeray : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेबाबत जोरदार राजकारण तापलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. (Thackeray) नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मीरा रोडमध्ये एका व्यापाऱ्याला चोप दिला. हे प्रकरण ताज असतानाच आता एका गुंतवणूकदाराने ट्वीट करत थेट मराठी न शिकण्याची प्रतिज्ञाच केली आहे. तसंच, त्याने राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे. यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

सुशील केडीया हे एक गुंतवणूकदार आहेत. गेल्या 30 वर्षापासून ते मुंबईत आपला व्यावसाय करतात. त्यांनी मराठीबाबत एक ट्वीट करत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘आय डोन्ट लव्ह मराठी, आय डोन्ट लर्न मराठी, क्या करना है बोल. असं ट्वीट त्यांनी केलं आहे. तसंच, त्यांनी या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला आहे.

Video : शरद पवारही जय कर्नाटक; म्हणाले होते; शिंदेंची पाठराखण करताना फडणवीसांचा दाखला

त्याचबरोबर मी 30 वर्ष मुंबईत राहतो. पण मला मराठी निट समजत नाही. मला मराठी आवडत नाही. मी ती शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे ते कर असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आता हे ट्वीट केल्यानंतर मनसैनिकांनी या केडीया यांना ट्वीटरवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर त्यांनी सुरक्षेची मागणी केली आहे. ते पुढे म्हणाले, की ठाकरे मराठी माणसाचे रक्षक असल्याचे फक्त भासवत आहेत. असा आरोपही त्यांनी केला आहे.

केडीया यांच्या या वक्तव्याने मनसैनिक भलतेच चिडले आहेत. त्यात उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजय उत्सुव साजरा करणार आहेत. त्या आधी केडीया यांनी केलेल्या या वक्तव्याने हा वाद आणखी चिखळण्याची दाट शक्यता आहे. मराठी बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं मनसे आणि शिवसेनेनं स्पष्ट केलं आहे. केडीया यांनाही चोप भेटणार काय असंच आता बोलल जातय.

follow us