काही राक्षस मोकाट फिरताय; मीरा-भाईंदर अमराठी व्यवसायिकाच्या मारहाणीवर अभिनेता संतापला

Ranvir Shorey Agressive on Mira Bhaindar Bitting to Non Marathi Hotel owner by MNS : राज्यामध्ये सरकारने आणलेल्या शाळांसाठी पहिलीपासून तिसरी भाषा आणण्याच्या निर्णयामुळे हिंदी-मराठी या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे. ठाकरे बंधूंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर हा जीआर मागे घेण्यात आला आहे. मात्र अद्याप देखील मराठी हिंदी वादावर मोठं घामासन सुरू आहे. याच दरम्यान मुंबईतील मीरा-भाईंदरमध्ये एका रेस्टॉरंट मालकाला मराठी बोलता येत नसल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण केली गेली होती. त्यावर आता एका बॉलीवूड अभिनेत्याने संताप व्यक्त केला.
काय म्हणाला रणवीर शौरी?
बॉलीवूड अभिनेता रणवीर शौर्य यांनी मीरा-भाईंदरमध्ये घडलेल्या या घटनेवर संताप व्यक्त केला. याबाबत त्याने एक सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यामध्ये रणवीर म्हणाला की, हे अत्यंत घृणास्पद आहे. काही राक्षस राजकीय फायदा आणि लक्ष वेधण्यासाठी मोकाट फिरतात कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे. या पोस्टमध्ये रणवीरने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केलं आहे.
This is sickening. Monsters on the loose, looking for attention and political relevance. Where’s L&O, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis? https://t.co/sMYUMcN1la
— Ranvir Shorey (@RanvirShorey) July 2, 2025
नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील मीरा रोड परिसरामध्ये एका अमराठी दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा ४० सेकंडचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. मात्र हा व्हिडिओ कट करून वापरण्यात आला त्याच्या मागील आणि पुढील गोष्टी समोर आल्यास नसल्याचं मनसे नेत्यांकडून म्हणण्यात आले आहे. दरम्यान या मारहाणी विरुद्ध मराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा देखील काढला होता.