Download App

फडणवीसांचा मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख अन् नोकरी देणार

  • Written By: Last Updated:

Pahalgam Attack Maharashtra Government Announces 50 Lakh Compensation : पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना  50 लाख देणार असल्याचा निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या शिक्षणाची आणि रोजगाराची हमीदेखील राज्य सरकार घेणार आहे. या हल्ल्यात पुण्यातली संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्यात येणार आहे. आज (दि.29) झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर यंत्रणांना मोठी माहिती; मास्टरमाइंडचा थेट पाकिस्तानच्या…

पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या घटनेत एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. ज्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा समावेश होता. डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे कुटुंबियांसोबत एकत्र काश्मीर फिरायला गेले, ज्यात या तिन्ही मावसभावांचा मृत्यू झाला. त्यांना दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हो दोघे लहानपणापासूनचे मित्रांचाही मृत्यू झाला. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

Pahalgam Terror Attack: ‘तो’ तिनदा अल्लाहू अकबर म्हटला आणि गोळीबार… हल्ल्याचा गुजरातच्या पर्यटकाने सांगितला थरार

पहलगाम हल्ल्यातील सर्व दहशतवाद्यांना घेरलं

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम हल्ल्याबाबत भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. (Attack) गेल्या सात दिवसांपासून फरार असलेल्या या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात आला आहे. भारतीय लष्कारातील अधिकाऱ्यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना घेरलं असल्याचं वृत्त आहे. सहा दहशतवाद्यांना घेरण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधून काढण्यात आलं आहे. काश्मीरमधील जंगलात लपलेल्या या हल्लेखोर दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेरलं आहे. त्या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. परंतु, ही चकमक नेमकी कुठं सुरु आहे, त्याबाबत अजून माहिती मिळाली नाही. पहलगाव हल्लामागे दहशतवादी हाशिम मूसाचा हात असल्याचे पुरावे भारतीय तपास संस्थांना मिळाले आहे. मूसा हा पाकिस्तानी नागरिक आहे. तो स्पेशल फोर्सेजचा पूर्व कमांडो आहे. त्याला पाकिस्तानच्या स्पेशल सर्विस ग्रुपकडून विशेष प्रशिक्षण मिळाले आहे. त्यानंतर तो लश्कर-ए-तैयबामध्ये सक्रीय झाला.

भारत कधीही हल्ला करू शकतो, पाकिस्तान घाबरला; लष्कर अलर्ट मोडवर

दहशतवादी आसिफ अन् आदिलचं घर जमीनदोस्त

पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी केलेली मोठी कारवाई समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठी मोहीम सुरू केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस त्रालमधील दहशतवादी आसिफच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी त्याच्या घरात स्फोटकांचा साठा होता, ज्यामुळे हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुलडोझर वापरून दहशतवादी आदिलच्या घरावर कारवाई केली ते घर जमीनदोस्त केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये दहशवादी सुरक्षा दलांना आव्हान देताना दिसत होते.

follow us