Download App

शेतकऱ्यांना दिलासा, मिळणार दुधासाठी सात रुपयांचे अनुदान, एका क्लीकवर जाणून घ्या 23 महत्वाचे निर्णय

Cabinet Meeting Decision : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या

  • Written By: Last Updated:

Cabinet Meeting Decision : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहे. त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 23 महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ज्यामध्ये राज्यातील 14 आयटीआय (ITI) संस्थांचे नामकरण, ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच सरपंच-उपसरपंचांचे वेतन दुप्पट करण्याचा निर्णय देखील आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

तसेच आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देत गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतला आहे.

मंत्रिमंडळाचे महत्वाचे 23 निर्णय

1. बालगृहे निरीक्षणगृहातील कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना : शिक्षकांना वरिष्ठ निवड श्रेणी (महिला व बाल विकास)

2. लोहगाव विमानतळाचे नाव जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय. (सामान्य प्रशासन)

3. कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश (इतर मागास बहुजन कल्याण)

4. धान उत्पादकांना दिलासा : आता प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर (अन्न नागरी पुरवठा)

5. जुन्नर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय (विधी व न्याय)

6. शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग. 1486 कोटीचा प्रकल्प (सार्वजनिक बांधकाम)

7. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास)

8. यवतमाळ, जळगांव जिल्ह्यातील सूतगिरणींना थकबाकी परतफेडीसाठी हप्ते (वस्त्रोद्योग)

9. मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रेतील नव्या संकुलाचे बांधकाम राज्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प (सार्वजनिक बांधकाम)

10. करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा (वित्त)

11. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ (ग्रामविकास)

12. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांना सुसज्ज क्रीडा सुविधा उभारण्यासाठी वांद्रेतला भूखंड (महसूल)

13. हरित हायड्रोजन धोरणात अँकर युनिटची पारदर्शकपणे निवड करणार (ऊर्जा)

14. एसटी महामंडळाच्या जमिनी बीओटी तत्वावर विकसित करणार : साठ वर्षाचा भाडेपट्टा करार (परिवहन)

15. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ ( नियोजन)

16. राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ (नियोजन)

17. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर ( सांस्कृतिक कार्य विभाग)

18. छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथील विधी विद्यापीठांना सात कोटी रूपये (उच्च व तंत्रशिक्षण)

19. दूध अनुदान योजना सुरु राहणार. उत्पादकांना गायीच्या दूधासाठी लीटरमागे सात रुपयांचे अनुदान (दूग्ध व्यवसाय विकास)

20. जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी (जलसंपदा)

21. श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मुळ मालकांना परत करणार (महसूल)

22. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट नियुक्ती देण्याच्या निर्णयात सुधारणा (क्रीडा)

Ajit Pawar : पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर, अजित पवारांकडून तयारीचा आढावा

23. राज्यातील 14 आयटीआय संस्थांचे नामकरण (कौशल्य विकास)

follow us