ठाकरे फडतूस, दगाबाज माणूस, केंद्रीय मंत्री राणेंनीही ठाकरेंना सोडलं नाही

उद्धव ठाकरे हा फडतूस, दुसऱ्यांचं चांगल न पाहणारा माणूस, दगाबाज माणूस, फडतूसपेक्षा भयानक शब्द वापरले तरी कमी आहे, या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फटकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेप्रकरणी तुम्हाला माफी मिळणार नसल्याचा इशाराही त्यांन यावेळी दिला आहे. फडतूस प्रकरणानंतर आज नारायण राणे […]

Narayan Rane

Narayan Rane

उद्धव ठाकरे हा फडतूस, दुसऱ्यांचं चांगल न पाहणारा माणूस, दगाबाज माणूस, फडतूसपेक्षा भयानक शब्द वापरले तरी कमी आहे, या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फटकारलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेप्रकरणी तुम्हाला माफी मिळणार नसल्याचा इशाराही त्यांन यावेळी दिला आहे. फडतूस प्रकरणानंतर आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंना चांगलंच झोडपलंय.

चाहत्याच्या कमेंटला प्रशांत दामले यांचे प्रेमाने उत्तर; म्हणाले, ‘अशोक मामा मला अशी हाक मारतो…’

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून कायम भाजपच्या नेत्यांवर टीका करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केलीय. या टीकेप्रकरणी तुम्हाला माफी मिळणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

तसेच उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची आम्ही भरपाई करणार असून आम्ही बाळासाहेब ठाकरेंकडे पाहुन गप्प होतो, बाळासाहेब तुम्हाला सेफ करुन गेले आहेत. माझं तोंड उघडायला लावू नका, अन्यथा तुम्हाला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त; सत्तासंघर्षाच्या निकालानंतर वाढणार हालचाली

उद्धव ठाकरे आता तुम्ही खालचा तळ गाठला आहे. तुमचा खालचा तळ उध्वस्त केल्याशिवाय घर खाली पडणार नाही. आजतागायत मोदींनी सर्वच वर्गांसाठी जवळपास 30 योजना भारतात सुरु केल्या आहेत. उद्धव ठाकरे लिहुन घ्या, कोरोना काळात बंद पडलेल्या उद्योगधंद्यांसाठी मोदींनी माझ्या खात्यात 5 लक्ष कोटी रुपये दिल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

अहमदनगरमध्ये दोन गटात प्रचंड राडा; अफवावर विश्वास ठेवू नका, पोलीसांचे अवाहन

आम्ही घरात घुसून मारु हे उद्धव ठाकरेंचं वाक्य आहे. उद्धव तुला तरी मातोश्रीचं गेट दरवाजे कुठे आहेत ते माहित आहे का? घरात घुसून मारायचं काम तुझं नाही हे सोडून दे. तू आपलं घरात बसून ऑपरेटरला कॉम्पूटर ऑपरेट करायला सांग कारण त्याला ऑपरेट करता येत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे हा फडतूस, दुसऱ्यांचं चांगल न पाहणारा माणूस, दगाबाज माणूस, फडतूसपेक्षा भयानक शब्द वापरले तरी कमी असल्याचंही ते म्हणाले आहेत. तसेच हा बिनडोक माणूस आहे. छत्रपती संभाजीनगर, कोकणात सभा घेताना म्हणतो की माझं रक्त उसळतयं, अरे तुझं रक्त कधीच उसळत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Exit mobile version