चाहत्याच्या कमेंटला प्रशांत दामले यांचे प्रेमाने उत्तर; म्हणाले, ‘अशोक मामा मला अशी हाक मारतो…’

Prashant Damle : मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणाऱ्या प्रशांत दामले (Prashant Damle) आणि अशोक सराफ (ashok saraf) यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. (social media) या दोन्ही कलाकारांनी आपल्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. यामुळे आज कलाविश्वात या दोन्ही कलाकारांकडे आदराने बघितले जाते.
या दोन्ही कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री असून अशोक सराफ, प्रशांत दामले यांना प्रेमाने एका खास नावाने हाक मारतात. प्रशांत दामले यांनी अलिकडेच या नावाचा नवा खुलासा केला आहे. प्रशांत दामले आणि अशोक मामा यांनी ‘आयत्या घरात घरोबा’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’, ‘प्रेमांकुर’, ‘आनंदी आनंद’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले आहे. यामुळे त्यांच्यात आजही चांगली प्रकारची मैत्री आजही कायम आहे.
View this post on Instagram
अलिकडेच प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर त्यांचे टोपणनाव सांगितले आहे. तसेच हे नाव अशोक सराफ यांनी दिल्याचे त्यांनी नवा खुलासा केला आहे. कायम सोशल मीडियावर सक्रीय असलेले प्रशांत दामले त्यांच्या नाटकांविषयी अनेक पोस्ट शेअर करत असतात. यामध्ये त्यांच्या नाटकांच्या प्रयोगाविषयी, रंगमंचावर काही घडणाऱ्या किस्स्यांविषयी ते भाष्य करत असतात.
Bholaa Box Office Collection: अजयच्या ‘भोला’ची छप्परफाड कमाई, सहा दिवसांत ‘इतक्या’ कोटींची उलाढाल
विशेष म्हणजे चाहत्यांना देखील कमेंट करुन त्यांच्याशी संवाद साधत असतात. प्रशांत दामले यांनी जानेवारी महिन्यामध्ये ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या नाटकाच्या ग्रुपसोबत एक फोटो पोस्ट करत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला. यामध्ये एका चाहत्याने “सेम टू यू. दांबले सर, परत हा प्रयोग गडकरी रंगायतन ठाणे येथे कधी होणार? वाट पाहतोय,” अशी कमेंट करण्यात येत आहेत, यावर प्रशांत दामले यांनी उत्तर देत अशोक मामांनी मला हेच टोपणनाव दिले असल्याचा खुलासा केला आहे.