अहमदनगरमध्ये दोन गटात प्रचंड राडा; अफवावर विश्वास ठेवू नका, पोलीसांचे अवाहन

अहमदनगरमध्ये दोन गटात प्रचंड राडा; अफवावर विश्वास ठेवू नका, पोलीसांचे अवाहन

अहमदनगर : रामनवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली हिंसक घटना ताजी असतानाच काल रात्री अहमदनगरमध्ये (Ahmednagar crime) दोन गटात राडा झाला. झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाला. वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. यात सहा व्यक्ती जखमी झाले तर एक वाहनाचे नुकसान झाले आहे.

अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर (Ahmednagar Police) रस्त्यावर गजराजनगरमध्ये मंगळवारी दोन गट भिडले होते. झेंडा लावण्यावरुन वाद सुरु झाला आणि वादाचे रुपांतर दगडफेकीत झाले. लाठ्या आणि लोखंडी रॉडने दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर तुटून पडले. मारहाणीनंतर काही समाजकंटकांनी परिसरातील वाहनांना लक्ष्य केलं. पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

नवीन महापालिका इमारती समोरही जमाव आक्रमक झाला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणले की ‘गजराज नगरच्या बाजूला वारूळवाडी ठिकाण आहे. काही मुलांमध्ये वाद झाला. गाड्यांची तोडफोड करण्यात आली. काही जखमी झाले आहेत. याचा तपास सुरु आहे. काही लोक वेगवेगळ्या अफवा पसरवत आहे, यावर लोकांनी विश्वास ठेवू नये. या घटनेतील आरोपींवर योग्य कारवाई करु, अशी माहिती ओला यांनी दिली आहे.

नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक, 2 पोलीस जखमी

काल रात्री नंदुरबार शहरात देखील दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले आहेत. दंगलचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत दगडफेक करणाऱ्या 6 ते 7 जणांना अटक करण्यात आली आहे. दोन गटातील वादातून ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील मालाडमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर हिंसाचार उसळला होता. रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटात दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती. तर दुसरीकडे रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडफेकीसह जाळपोळही करण्यात आली. लोकांनी पोलिसांवरही दगडफेक केली त्यात 10 पोलीस जखमी झाले होते.

पुण्यात खळबळ! माजी गृहमंत्र्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी

याशिवाय जळगावात शनिवारी 1 एप्रिल रोजी असाच एक प्रकार उघडकीस आला होता. याठिकाणी मूर्ती फोडल्यानंतर दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube