नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक, 2 पोलीस जखमी

नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक, 2 पोलीस जखमी

नंदुरबार : शहरात (Nandurbar) मंगळवारी रात्री दोन गटांमध्ये दगडफेक झाली. दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले आहेत. दंगलचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत दगडफेक करणाऱ्या 6 ते 7 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी (Nandurbar Police) दिली. दोन गटातील वादातून ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

रामनवमीच्या दिवसापासून राज्यातील विविध भागातून हिंसाचार आणि दगडफेकीच्या घटना समोर येत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा, जळगाव आणि मुंबईतील मालाड येथे हिंसक घटना घडल्या होत्या. त्याचवेळी नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेकीची घटना समोर आली आहे.

मंगळवारी नंदुरबार शहरात दोन बाजूंनी दगडफेक झाली. मात्र, दंगल का झाली, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी 6 ते 7 जणांना अटक केली आहे. नंदुरबारशिवाय अहमदनगर जिल्ह्यातही दोन गटात हिंसक दगडफेक झाली. दगडफेकीबरोबरच जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. दगडफेकीत सहभागी लोकांनी वाहने पेटवून दिली आणि यादरम्यान अनेक जण जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षाला लाखो डॉलर्सचा दंड, पॉर्न स्टारला द्यावी लागणार नुकसान भरपाई

मुंबईतील मालाडमध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर हिंसाचार उसळला होता. रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटात दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती. तर दुसरीकडे रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडफेकीसह जाळपोळही करण्यात आली. लोकांनी पोलिसांवरही दगडफेक केली त्यात 10 पोलीस जखमी झाले होते.

याशिवाय जळगावात शनिवारी 1 एप्रिल रोजी असाच एक प्रकार उघडकीस आला होता. याठिकाणी मूर्ती फोडल्यानंतर दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून याप्रकरणी 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube