Download App

घरात दारूची पार्टी कायदेशीर? रेव्ह पार्टी म्हणजे काय? वकिलांनी सांगितली व्याख्या अन नियम…

Can Friends Liquor Party At home : पुण्यातील उच्चभ्रू परिसरात शनिवारी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत खराडी परिसरातील काही पबवर रेड टाकण्यात आली. या रेडमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक केली. त्यांच्यावर रेव्ह पार्टीचा (What Is Rave Party) आरोप केला जातोय. या घटनेनंतर रेव्ह पार्टी म्हणजे काय? इतर पार्ट्यांमध्ये अन् या रेव्ह पार्टीत नेमका काय फरक आहे, असा सवाल उपस्थित केला जातोय. यासंदर्भात लेट्सअप मराठीने वकील मिलिंद पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. त्यांनी रेव्ह पार्टीसंदर्भात (Liquor Party) सविस्तर माहिती दिली आहे.

VIDEO : अजित पवार पहाटे उठतात, पण… हिंजवडीचे प्रश्न सुटणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

घरात दारूची पार्टी कायदेशीर?

कायद्यानुसार कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सोबत ठेवणं, विक्री करणं, साठा ठेवणं, वापरणं हा कायद्याने गुन्हा आहे. कोकेनचा वापर झालेला असेल तर वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाल्यास आरोपींना त्रास होवू शकतो. एखाद्या गोष्टीची माहिती मिळाल्यास तपास करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. घरात ज्या पार्टी होतात, त्यांना हाऊस पार्टी, गेट-टुगेदर असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या घरात रोजच कार्यक्रम असतात, चार भिंतीच्या आत एखाद्या हॉटेलमध्ये येवून जेवण गेट-टुगेदर करत असतील, तर तो गुन्हा नाही. संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे.

रेव्ह पार्टी म्हणजे काय?

पुणे शहराला 2007 मध्ये रेव्ह पार्टीची ओळख झाली होती. दोनशे ते अडीचशे तरूण मुलं-मुली सिंहगड पायथ्याशी सापडले. रेव्ह पार्टीला कोणी तरी आयोजक असतो. ओपन लॉन जंगल, समुद्र किनारा किंवा एखादी जागा तो बूक करतो. ठरावीक लोकांचं बुकिंग घेतो, त्या पैशाच्या बदल्यात मद्य, म्युझिक सिस्टिम अन् इतर गोष्टी पुरवल्या जातात. तिथं येणाऱ्या मुलांच्या डिमांडनुसार संगीत असतं, चेव आणणारं म्युझिकं असतं, याला रेव्ह पार्टी असं म्हणतात.

मी आत कोणतंही पाऊल उचलण्याच्या तयारीत; संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख असं का म्हणाले?

जर चार-पाच लोक एकत्र येवून गेट-टुगेदर करत असतील, स्वत:च्या घरात पार्टी करत असतील, तर त्याला रेव्ह पार्टी कसं म्हणता येईल? असा सवाल देखील यावेळी वकील मिलिंद पवार यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणाला राजकीय अॅंगल आहे. खडसेंच्या जावयाला अटक केली, याला काय नाव ठेवलं? याला न्यायालयात फरक पडत नाही. पार्टीमध्ये ड्रग्स घेणार असल्याची माहिती मिळाली असेल. सापळा रचून अटक करण्यात आली असेल. ही स्टोरी प्लॅन असावी, असा आरोप देखील मिलिंद पवार यांनी केलाय.

खडसेंच्या जावयाला अटक

व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी तरूणीच्या बॅगमधून काहीतरी काढतेय, तर दुसरीकडे पोलीस अधिकारी सोफा उचलून त्याखालून सिगारेटसारखी एक वस्तू काढत आहेत. गांजा देखील सापडला. पार्टीच करत असतील, तर स्वत:च्या वापरासाठी गोष्टी ठेवल्या असतील. आता ती पावडर होती की, खरंच कोकेन होती हे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल.

 

follow us