Local Crime Branch : थेट घरातूनच सुरू होती गांजाची विक्री… स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Local Crime Branch : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे राहत्या घरातून गांजाची अवैध विक्री करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात

Local Crime Branch

Local Crime Branch

Local Crime Branch : नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे राहत्या घरातून गांजाची अवैध विक्री करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे. ही कारवाई १९ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आली असून, या प्रकरणी गांजा पुरवठा करणाऱ्या दुसऱ्या एका आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या धडक कारवाईत ११.१८२ किलो गांजासह एकूण ५ लाख ६० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हरीष भोये व पथक नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांची माहिती घेत होते. दरम्यान, कुकाणा येथील मुलाणीवाडा (जुम्मा मशीदजवळ) परिसरात राहणारा शाहमद मेहबुब शेख हा आपल्या घरात गांजा साठवून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने नेवासा पोलिसांना लेखी अहवाल देऊन कळवले. त्यानंतर शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार सपोनि अमोल पवार, नेवासा पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने पंचांच्या उपस्थितीत शाहमद मेहबुब शेख याच्या घराची झडती घेतली.

तपासादरम्यान घरात गांजा आढळून आल्याने शाहमद मेहबुब शेख (वय ४८, रा. मुलाणीवाडा, जुम्मा मशीदजवळ, कुकाणा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) यास ताब्यात घेण्यात आले. ५,५९,१०० रुपये किमतीचा, ११.१८२ किलो वजनाचा गांजा (तीन गोण्यांमध्ये) तसेच इतर वजन काटा (१,००० रुपये), वजन मापे (३०० रुपये), स्टीलचे भांडे (२०० रुपये) आणि प्लॅस्टिक पिशव्या (१०० रुपये)अशा प्रकारे एकूण ५,६०,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याने हा गांजा मल्हारी मोहन बोरूडे (रा. मजलेशहर, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पथकाने शोध घेऊन मल्हारी बोरूडे यालाही ताब्यात घेतले.

भारताचे जोरदार पुनरागमन! राहुल-जायसवालची दमदार फलंदाजी; 10 वर्षांनंतर मोडला ‘हा’ विक्रम

याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना मुद्देमालासह नेवासा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.

Exit mobile version