Samruddhi Mahamarg Accident Updates : सैलानी बाबाच्या दर्शनासाठी बुलढाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला काल भीषण अपघात (Travels bus accident) झाला. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला तर 23 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन आरटीओ अधिकारी (RTO Officer) आणि एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीओचे दोन अधिकारी आणि ट्रक ड्रायव्हरच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गुणरत्न सदावर्ते चिल्लर माणूस तर भुजबळ मराठा द्वेषी…; भाजप नेत्याचे टीकास्त्र
टेम्पो ट्रॅव्हल्सचा चालक कमलेश लहू म्हस्के यांच्या फिर्यादीवरून आरटीओ अधिकारी प्रदीप छबुराव राठोड, नितीशकुमार सिद्धार्थ बोरणारकर आणि ट्रकचालक ब्रिजेशकुमार कमलसिंग चंदेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिवहन विभागाच्या आयुक्तांनी तात्काळ दोन्ही अधिकाऱ्यांचे निलंबन केलं.
पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी व इंद्रनगर येथील रहिवासी बुलढाणा येथील सैलानी बाबांचे दर्शन करून खासगी बसने एम.एच. 04 जी.पी. 2212 ने नाशिककडे जात होते. यावेळी वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावर हडस पिंपळगाव टोल नाक्याजवळ आरटीओ अधिकाऱ्यांनी एमपी 09 एच एल 6483 क्रमांकाचा ट्रक चालकाला हात देऊन थांबवलं. यावेळी प्रवाशांच्या ट्रॅव्हल्स बस ट्रकला धडकली आणि अपघात झाला. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण गंभीर जखमी झाले आहेत.
आरटीओने हात देताच ट्रक चालकाने ट्रक हा ८० किमी असलेल्या लेनमध्ये अचानक भरधाव वेघात घेतला. त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलर गाडी ही पाठीमागून येणाऱ्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, बसच्या समोरील भागाच चक्काचूर झाला.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये 304(2), 308, 337, 338, 34, 427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या २ अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांचे निलंबन करण्यात आले. पुढील तपास पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे.