Nana Patole : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) गेल्या काही दिवसांपासून जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करत आहे. राहुल गांधी यांच्याबरोबर इंडिया आघाडीतील अनेक नेते आणि एनडीएचे (NDA) घटक पक्ष जेडीयू आणि लोक जनशक्ती पक्षाने देखील जातीनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. यातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी देखील या मुद्यावरून भाजपवर (BJP) जोरदार टीका करत जातीनिहाय जनगणना न करणे संविधानाचा अपमान आहे असं ते म्हणाले. ते टिळक भवन येते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना, नाना पटोले म्हणाले की, ज्यांना संविधान बदलाची जाणीव नाही. या देशाच्या श्रमाची आणि या देशाच्या शोषित पीडितांच्या प्रश्नाची जाणीव नाही. त्यांना जातीनिहाय जनगणना करायची नाही असा टोला देखील यावेळी नाना पटोलेंनी भाजपला लावला. तसेच हा मुद्दा राजकारणासाठी नाही तर शेवटच्या शोषित समाजाला न्याय प्रवाहामध्ये आण्यासाठी जातीनिहाय जनगणनेची गरज आहे. असेही यावेळी नाना पटोले म्हणाले.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, जेव्हा मंडळ आयोग आला होता तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, ओबीसीमध्ये किती संख्या आहे, त्या वेळेस आपण हा आकडा देऊ शकला नाही त्यामुळे ओबीसी समाजाला एक अंदाजित आरक्षण देण्याची व्यवस्था निर्माण झाली तसेच जातीनिहाय जनगणनेला तीन पॅरामीटर आहे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक असं देखील ते म्हणाले. मोहन भागवत यांनी देखील अनेकदा आरक्षण संपवण्याची भाषा केली आहे. म्हणून ते लोकं जातीनिहाय जनगणना होऊ देत नाही असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.
PM मोदी आजपासून सिंगापूर आणि ब्रुनेईच्या दौऱ्यावर, जाणून घ्या काय आहे अजेंडा?
तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून 288 मतदारसंघात निवडणुका लढवणार आणि यासाठी आमची तयारी सुरु आहे अशी माहिती देखील या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना नाना पटोले यांनी दिली. माहितीनुसार, येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग राज्यात विधानसभेसाठी निवडणुकीची घोषणा करणार आहे.