दिल्ली अन् गुजरातसमोर झुकणारे भाजप सरकार उखडून फेका…; नाना पटोलेंचे आवाहन
Nana Patole : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना भाजप (BJP) आणि महायुती (Mahayuti) सरकावर जोरदार टीका केली. महाराष्ट्राच्या स्वाभिमान विसरून दिल्लीसमोर आणि गुजरातच्या लॉबीसमोर झुकणारे राज्यातील सरकार आहे. हे भाजप युती सरकार उखडून फेका, असं आवाहन पटोलेंनी केली.
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण संपणार; लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान
उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदुरबारमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री के. सी. पाडवी, खासदार गोवाल पाडवी, खासदार शोभा बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष संघटना व प्रशासन नाना गावंडे आदी नेते उपस्थित होते.
सरकारने भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम रचले
यावेळी बोलतांना पटोले म्हणाले, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला. कर्नाटकातील भाजप सरकार 40 टक्के कमिशनवाले होते. महायुती सरकार तर त्यापुढेही गेले आहे, या सरकारने भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, त्यामुळे सर्वात महागडे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख निर्माण झाली. महायुती सरकार गुजरात धार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमान विसरून दिल्लीसमोर आणि गुजरातच्या लॉबीसमोर झुकणारे भाजप युती सरकार उखडून फेका, असं आवाहन पटोले यांनी केले.
मोठी बातमी! डॉक्टरांचा संप मागे, फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशचा निर्णय..
बदलापूरमधील शाळा भाजपशी संबंधित
पुढं ते म्हणाले की, बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे लोकांमध्ये तीव्र संताप आहे. सरकारने कारवाई न केल्याने हजारो लोक रस्त्यावर आले, मात्र महायुती सरकारला यात राजकारण दिसत आहे. ही घटना घडलेल्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, ती शाळा भाजपशी संबंधित आहे. शाळेने सीसीटीव्ही फुटेज गायब केले, असा आरोप पटोलेंनी केला.
ही घटना 12 तारखेला घडली आणि 15 तारखेला मुख्यमंत्री बदलापूरमध्ये होते त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. पीडित मुलीच्या गरोदर मातेला 12 तास पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या दबावामुळे गुन्हा दाखल करावा लागला. बदलापूर, अकोला, लातूर, नागपूर येथे अशाच घटना घडल्या असताना संतप्त महिलांनी 1500 रुपये नको, मुलींना संरक्षण द्या, अशी मागणी केल्याचं पटोले म्हणाले.
पोलिसांवर सरकारचा दबाव…
बदलापूरच्या वरिष्ठ पीआय महिला असतानानाही त्यांनी पीडितेच्या आईला 12 तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवलं. त्यांच्यावर सरकारचा दबाव होता, हे आता स्पष्ट आहे. सरकार आपले पापं लवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या आयपीएस अधिकाऱ्यांची एसआयटी नेमली त्यांची कामगिरी संशयास्पद आहे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे तर भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे या दोघांना बदलावे अशी मागणी पटोलेंनी केली.